युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:08 PM2020-04-02T17:08:37+5:302020-04-02T17:08:59+5:30

जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.

All roads in Erandgaon closed due to youth initiative | युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

Next

एरंडगाव : जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तसेच गावात आता एकही वाहन प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
फक्त रस्ते बंद करून हे युवक थांबले नाही तर ज्या भागात मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कामही या युवकांनी हाती घेतले आहे. येथील युवक एकत्र येऊन विविध उपक्र म राबवत असतात. या लॉकडाउन काळात, संचारबंदी कालावधीत गरीब कुटुंबातील आजारी व्यक्तींना मेडिकल व दवाखान्याचा खर्च पुरविणे. गरीब व गरजू कुटुंबांना किराणा वाटप करणे आदी उपक्र म राबवित आहेत. या उपक्र मात रवींद्र साताळकर, शरद रंधे, सतीश काळे, अनिल पडोळ, बाबासाहेब गोविंद, रशीद पटेल, मुक्तार पटेल, सागर सुराणा, ज्ञानेश्वर पडोळ, तुकाराम पडोळ, अश्फाक सैय्यद, देविदास खकाळे, दत्तू बोराडे, गोरख शिंदे, समाधान आहेर, सागर आहेर, गणेश चौघुले, असिफ पठाण, खलील पठाण, आवेद शेख, जावेद शेख, तन्वीर शेख आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, करोनापासून गाव वाचवण्यासाठी एरंडगाव येथील युवक राबवत असलेले उपक्र म स्तुत्य आहे. गावातील प्रत्येक घरी भाजीपाला, आवश्यक किराणा पोहोच करून गरजूंची चिंता मिटवली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून मास्क वाटप केले आहेत. एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास तातडीने मदत केली जाते. हा आदर्श इतर गावातील युवकांनीही घ्यावा, असे सुरेश उशीर यांनी सांगितले. तर एरंडगावातील युवक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश बंद करणे हे अमानवीय आहे. ज्यावेळी गावात काही सार्वजनिक कार्यक्र म असो अथवा निवडणूक असो अशावेळी गावपुढाऱ्यांना प्रथम गावातील मतदार यादीत असलेले पण नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्यांची आठवण येते. मग संकटकाळी त्या लोकांना गावात यायचे असल्यास त्यांना गावात येण्यास बंदी करायची, हे योग्य नाही अशी भावना बाहेरगावी नोकरीस असलेला एरंडगावकरांनी व्यक्त केली आहे.

Web Title: All roads in Erandgaon closed due to youth initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.