पंचवटीतील सर्वच रस्ते जलमय; वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 03:09 PM2019-08-04T15:09:30+5:302019-08-04T15:11:42+5:30
अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी साचलेले होते.
पंचवटी : परिसरातील सर्व विभागातील ड्रेनेज तुडुंब भरल्याने अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले तर मुख्य रस्त्यावर दीड ते दोन फुटापर्यंत पुराचे पाणी साचले होते. रविवारी (दि.4) पंचवटीतील पेठरोड, दिंडोरीरोड, तळेनगर परिसरात असलेल्या रस्त्यावर पाणी पाणी झाल्याने संपूर्ण रस्ते जलमय झालेले होते.
संपूर्ण रस्त्यावर पाणी पाणी साचल्याने पेठरोड, दिंडोरीरोड रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक काही काळ बंद झालेली होती. काल शनिवारी (दि.3) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी दुपारपर्यंत कायम असल्याने पंचवटी परिसरातील बहुतांश भाग जलमय झालेला होता ड्रेनेज नाले तुंबल्याने पेठरोड आरटीओ तळेनगर रामवाडी परिसरात राहणारे अनेक नागरिकांच्या घरातून पाणी वाहत होते मनपा प्रशासनाने नालेसफाईचा दावा केला असला तरी हा दावा पूर्णपणे फोल झाल्याचे दिसून आले.
अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाचा जोर दुपारपर्यंत कायम असल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.
पालिका अधिकार्यांचे दुर्लक्ष
सलग दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचवटी परिसरात अनेक नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी तुंबले होते या प्रकारानंतर अनेक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे संपर्क साधला असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी स्विच ऑफ होते तर प्रभागातील काही लोकप्रतिनिधींना पाणी तुंबले अशी माहिती दिल्यानंतर सगळीकडे हीच परिस्थिती आहे कोणी कर्मचारी भेटतो का बघतो पाठवतो अशी उत्तरे नागरिकांना दिल्याने नागरिकांनी मनपा अधिकारी व संबंधित प्रभागाच्या लोकप्रतिनिधी विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.