ग्रामविकासासाठी सर्व सरपंच संघटनांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:03+5:302021-08-24T04:18:03+5:30

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार सर्व ग्रामपंचायती सक्षम होण्यासाठी व सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक सरपंच संघटना कार्यरत आहेत. ...

All Sarpanch organizations should come together for rural development | ग्रामविकासासाठी सर्व सरपंच संघटनांनी एकत्र यावे

ग्रामविकासासाठी सर्व सरपंच संघटनांनी एकत्र यावे

Next

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार सर्व ग्रामपंचायती सक्षम होण्यासाठी व सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक सरपंच संघटना कार्यरत आहेत. या सर्व संघटना आपआपल्या पातळीवर आपल्या संघटनेच्या माध्यमातून सरपंचांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहेत. मात्र या संघटना आपल्या पातळीवर काम करताना शासन दरबारी आपल्या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देत असतात. परंतु अनेक संघटना असल्यामुळे या सरपंच संघटनांचा प्रभाव एकत्रितपणे दिसून येत नाही . त्यामुळे या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन सरपंचांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याशी चर्चा केली व सर्व संघटनांनी एकत्रित येऊन चर्चा व विचार विनिमय करण्याचे आवाहन पवार यांना करण्यात आले.

सर्व सरपंच संघटनांनी एकत्रित येऊन चर्चा व विचार विनिमय करावा. आवश्यकता भासल्यास आपण सर्व जण विचार विनिमयासाठी एकत्रित बसू असे पोपटराव पवार यांनी सांगितले.

यावेळी सरपंच सेवा महासंघाचे राजाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे, सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे, राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब गिराम, रामनाथ बोऱ्हाडे, राजेंद्र कांहाडळ, अहमनगर जिल्हाध्यक्ष अनिलराव शेंडाळे, ग्रामीण राजकीय अभ्यासक शरद दारकुंडे सर, सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव आदींसह पदधिकारी उपस्थित होते.

फोटो - २३ हिवरे बाजार

हिवरे बाजार येथे सरपंच सेवा संघ महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोपटराव पवार, पुरुषोत्तम घोगरे, राहुल हुके, शशिकांत मंगळे, भाऊसाहेब कळसकर, दिनेश घाडगे.

Web Title: All Sarpanch organizations should come together for rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.