मनपाच्या सर्वच शाळांना ‘अ’ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:11 PM2018-08-12T23:11:47+5:302018-08-13T00:31:20+5:30
शासनाच्या निकषानुसार मागे पडलेल्या सर्व शाळांमध्ये प्रगत अध्ययन उपक्रम आणि अचूक प्रतिसाद मिळवत नाशिक महापालिकेच्या सर्व म्हणजे ९० शाळा प्रगत किंवा अर्ज दर्जाच्या झाल्या असून, तसे शिक्षण खात्याने प्रमाणित केले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी त्याची घोषणा केली जाणार आहे.
नाशिक : शासनाच्या निकषानुसार मागे पडलेल्या सर्व शाळांमध्ये प्रगत अध्ययन उपक्रम आणि अचूक प्रतिसाद मिळवत नाशिक महापालिकेच्या सर्व म्हणजे ९० शाळा प्रगत किंवा अर्ज दर्जाच्या झाल्या असून, तसे शिक्षण खात्याने प्रमाणित केले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी त्याची घोषणा केली जाणार आहे.
महापालिकेच्या निमशासकीय शाळांमध्ये येणारा वर्ग हा समाजातील मध्यम आणि निम्नस्तरावरील असतो. साहजिक येथे येणाऱ्या मुलांना अध्यापन करताना शिक्षकांची प्रतिष्ठा पणाला लागत असते. शासनाने अशाप्रकारच्या शाळांचा दर्जा उन्नत करण्यासाठी प्रगत शाळा अभियान २०१५ मध्ये सुरू केले. त्या अंतर्गत २५ निकष ठरविण्यात आले. प्रत्येक निकषाला पाच गुण याप्रमाणे सध्या १२५ गुण दिले जातात. यात
शाळा परिसर स्वच्छता, ज्ञान रचनावादी सिद्धांतानुरूप साहित्यपासून विद्यार्थ्याला किमान एक अचूक बेरीज करता आली पाहिजे तसेच गुणकार भागाकार करता आले पाहिजेत, तसेच वजन मापे, आकारमान, लांबी-रुंदी, वेळ सांगता आली पाहिजे आणि पाच वाक्ये वाचता आली पाहिजे अशाप्रकारच्या अटी आहेत.
राज्य शासनाने त्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करण्यास सांगितले आहे. राज्य शासनाच्या या
मोहिमेत नाशिक महापालिकेच्या पूर्वीच्या १२८ शाळांपैकी १३ शाळांना अपेक्षित गुण प्राप्त होत नसल्याने त्या मागे पडल्या होत्या.
शासनाने ० ते ४०, चाळीस ते साठ, साठ ते ऐंशी आणि पुढे
शंभर अशाप्रकारच्या गुणदानाचे निकष ठरवले आहेत.
त्यानुसार महापालिकेच्या यात १३ शाळांसाठी गेल्या वर्षीपासून कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र आयुक्तांनी शाळा एकत्रीकरण करून १२८ शाळांपैकी अनेक शाळा
एकत्र करून ९० शाळा
तयार करण्यात आल्या आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने प्रयत्नपूर्वक कृती योजना राबविली आणि आता सर्व शाळा ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून ‘अ’
दर्जापर्यंत पोहोचल्या आहेत.
उर्दू शाळा अधिक सरस
शासनाच्या प्रगत शाळा योजनेंतर्गत नाशिक महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळा अधिक प्रगत ठरल्या असून, त्यांचे उर्दू शैक्षणिक साहित्य राज्यस्तरावर आदर्श मानले गेले आहे.