मालेगावी ब्रिटनमधून आलेले सातही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:32 AM2020-12-28T00:32:58+5:302020-12-28T00:33:50+5:30
जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.
मालेगाव : जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.
अत्यंत वेगाने संसर्ग होऊन फैलावणाऱ्या नव्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून राज्य शासनातर्फे पुरेशी काळजी घेतली जात आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांना नव्या विषाणूची बाधा तर नाहीना म्हणून त्यांची टेस्ट केली जात आहे. मालेगावातही ब्रिटनमधून सात जण आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते. तत्काळ सातही जणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्यात आले
आहे.
nमालेगावी सर्वे नं. १६ बाग - ए- महेफुस भागातील सात नागरिक ब्रिटनमधून आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ त्यांचा शोध घेऊन त्यांची ‘टेस्ट’ केली होती. सातही जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे.
nब्रिटनमधून आलेले सातही नागरिक एकाच घरातील सदस्य असून त्यांना स्वतंत्र बंगल्यात ठेवण्यात आले आहे. त्यांना आणखी सात दिवस घराबाहेर पडू नका, अशा सूचना मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.