पुरात तिघे जण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:50 AM2019-08-06T01:50:52+5:302019-08-06T01:51:29+5:30
मित्रांसोबत पोहण्यासाठी गोदापात्रात सूर मारणारा पंचवटी परिसरातील युवक सोमवारी (दि.५) दुुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाहून गेल्याचे उघडकीस आले. तसेच लाखलगाव येथे पाय घसरून एक इसम गोदावरीच्या पुरात वाहून गेला. रविवारी दुपारच्या सुमारास नासर्डी नदीपात्रात वाहून गेलेल्या शिवाजीवाडीमधील इसमाचाही अद्याप थांगपत्ता लागू शकला नाही. पुराच्या पाण्यात एकूण तिघे वाहून गेले आहेत. याबाबत विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.
नाशिक : मित्रांसोबत पोहण्यासाठी गोदापात्रात सूर मारणारा पंचवटी परिसरातील युवक सोमवारी (दि.५) दुुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाहून गेल्याचे उघडकीस आले. तसेच लाखलगाव येथे पाय घसरून एक इसम गोदावरीच्या पुरात वाहून गेला. रविवारी दुपारच्या सुमारास नासर्डी नदीपात्रात वाहून गेलेल्या शिवाजीवाडीमधील इसमाचाही अद्याप थांगपत्ता लागू शकला नाही. पुराच्या पाण्यात एकूण तिघे वाहून गेले आहेत. याबाबत विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पंचवटी फुलेनगर परिसरातील राहुल गवारे, प्रवीण चौधरी, रोहित उफाडे आणि आकाश शिवा लोंढे (१९, रा. फुलेनगर) हे चौघे मित्र पूर बघण्यासाठी आले होते. यावेळी चौघांनी नदीपात्रात पोहण्यासाठी संत गाडगे महाराज पुलाच्या रेलिंगवरून उडी घेतली. यावेळी चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले, मात्र आकाशला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो टाळकुटेश्वर पुलाखालून पुढे वाहून गेला.
पुलाखालून वाहून जाताना काहींनी आकाशला बघितल्याचेही सांगितले. एका राहुल नावाच्या युवकाने त्याला कन्नमवार पुलापर्यंत वाहत जाताना पाहिले. दरम्यान, टाळकुटेश्वर पुलापासून पंचवटी अमरधामपर्यंत गर्दी जमली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला दुसऱ्या घटनेत लाखलगाव जवळील कालवी गावतील परशराम काशीनाथ अनवट (४७) यांचा पाय नदीकाठालगत घसरून तोल गेल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांचाही उशिरापर्यंत शोध लागला नाही. यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. तसेच नासर्डी नदीकाठालगतच्या शिवाजीवाडी घरकुल प्रकल्पामधील रहिवासी संजय एकनाथ वल्हाड (४०) हे नासर्डीच्या पुरात रविवारी दुपारी वाहून गेले आहे.
गोदाकाठावर आईचा टाहो...
पुरात कोण पोहणार? याची चढाओढ लागली अन् एकापाठोपाठ चौघा मित्रांनी दुथडी वाहणाºया गोदापात्रात उडी घेतली. तिघांना पिंपळपारापर्यंत नदीकाठ गाठणे शक्य झाले, मात्र सर्वात अगोदर उडी घेतलेल्या आकाशचा रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता लागला नाही. मुलगा बुडाल्याची वार्ता कानी येताच आकाशची आई लता लोंढे यांच्यासह नातेवाइकांनी गोदाकाठी येऊन एकच टाहो फोडला.