नाशिक कृउबा समितीतील सर्व व्यवहार २३ मेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:40+5:302021-05-12T04:15:40+5:30

प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करत बुधवारपासून (दि. १२) सलग बारा दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. ...

All transactions in Nashik Kruuba Samiti closed till 23rd May | नाशिक कृउबा समितीतील सर्व व्यवहार २३ मेपर्यंत बंद

नाशिक कृउबा समितीतील सर्व व्यवहार २३ मेपर्यंत बंद

Next

प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करत बुधवारपासून (दि. १२) सलग बारा दिवस लॉकडाऊन

जाहीर केला आहे. शासनाच्या आदेशानुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती देखील दहा दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी दिली .

बाजार समिती बंद राहणार असल्याने लिलावासह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

गेल्यावर्षी देखील कोरोना संसर्ग वाढल्याने बाजार समिती तीन ते चार दिवस बंद केली होती तर आता पुन्हा जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात रुग्ण वाढल्याने प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. बाजार समिती बंद राहणार असल्याने दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना मोठे

आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. बुधवारी (दि.१२) दुपारी बारा वाजेनंतर बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने आगामी बारा दिवस बाजार समितीत शुकशुकाट पसरलेला बघायला मिळणार आहे.

Web Title: All transactions in Nashik Kruuba Samiti closed till 23rd May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.