मनपाच्या रस्ता कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:11 AM2021-07-03T04:11:06+5:302021-07-03T04:11:06+5:30

नाशिक : सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून शहरात रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला ...

Allegation of misconduct in Corporation's road works | मनपाच्या रस्ता कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप

मनपाच्या रस्ता कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप

Next

नाशिक : सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून शहरात रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त करीत या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

रस्त्यांची कामे कशी करावीत याबाबत शासनाची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आलेली आहेत. परंतु रस्त्यांचे डांबरीकरण करताना या तत्त्वांचे पालन झाले नसल्याने नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रभागातील पावसाळी गटार योजनेची कामे तसेच डांबरीकरणाची कामे नियमानुसार झाली नसल्याने नागरिकांना या कामांचा त्रास होऊ लागला आहे. प्रभाग १७ मधील लोखंडे मळा परिसरातील नागरिकांनीदेखील रस्ते तसेच पावसाळी गटार कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे.

अत्यंत घाईघाई करण्यात आलेल्या कामांचा दर्जा अत्यंत सुमार असून या कामांची तसेच महापालिकेने शहरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी ढगे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

020721\02nsk_37_02072021_13.jpg

पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देतांना माजी नगरसेवक शैलेश ढगे

Web Title: Allegation of misconduct in Corporation's road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.