युती सरकारमुळेच सिंचन प्रकल्प रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:43 PM2017-09-11T23:43:36+5:302017-09-11T23:43:36+5:30
पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषद : दीपिका चव्हाण यांचा आरोप
सटाणा : बागलाण तालुक्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरणारे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् झाला असता मात्र आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या सिंचन प्रकल्पांच्या निविदा भाजपा-सेना युतीच्या सरकारने रद्द केल्यामुळेच तीन वर्षे रखडले आणि त्याची किंमतही वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
आपण आवाज उठविल्यानंतर सरकारला जाग येऊन हरणबारी डावा कालवा आणि तळवाडे भामेर पोच कालव्यासाठी ७४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली. आघाडी सरकारच्या काळातच हरणबारी डावा कालवा ,तळवाडे भामेर पोच कालवा,केळझर चारी क्र मांक आठ व पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे डाव्या कालव्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळेच या प्रकल्पांची साठ ते सत्तर टक्के कामे पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून आमदार चव्हाण म्हणाल्या की, या प्रकल्पाची कामे करतांना भूसंपादनात अनेक शेतकर्यांच्या जमिनी जात असल्यामुळे विरोध झाला त्यामुळे साहजिकच शेतकर्यांची मने वळविण्यात बराच वेळ गेला.
बागलाणमधील हे दोन्ही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकामी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील वारंवार पाठपुरावा केल्यामुळे एवढा मोठा निधी पदरात पाडून घेण्यात यश आल्याचे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.