शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 10:09 PM2020-07-02T22:09:14+5:302020-07-02T22:51:18+5:30
येवला : तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना तत्काळ पीककर्ज वाटप करून तालुक्याचा इष्टांक पूर्ण करावा व कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना प्रांताधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाºयांना केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रांताधिकारी कासार यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँक अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. त्यात शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप व्हावे यासाठी सुलभ पीककर्ज अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला. २९ जून ते १० जुलै २०२० या कालावधीत जिल्हा बँकेच्या तालुक्यातील एकूण १२ शाखेत तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियानात शेतकºयांना फॉर्म भरून देणे व त्यासाठी लागणारे कागदपत्रे व कर्जाची माहिती यासाठी सहकार खात्याचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी, जिल्हा बँकेचे अधिकारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तलाठी मदत करणार आहेत.
शेतकरी सभासदांनी अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रांत कासार यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार रोहिदास वारूळे, सहायक निबंधक एकनाथ पाटील, सहायक सहकार अधिकारी आर. पी. जाधव यांच्यासह बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.