जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, ज्वारी बियाणांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 05:45 PM2018-11-25T17:45:33+5:302018-11-25T17:45:47+5:30
सिन्नर : तालुक्यात तीव्र दुष्काळाची स्थिती असून जनावरांना चाºयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पशूधन विभागाच्या वतीने बियाणांचे वाटप केले जात आहे.
सिन्नर : तालुक्यात तीव्र दुष्काळाची स्थिती असून जनावरांना चाºयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पशूधन विभागाच्या वतीने बियाणांचे वाटप केले जात आहे. पशूधन असलेल्या शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, पशूधन विकास अधिकारी डॉ. मिलींद भणगे यांनी केले आहे.
तालुक्यासाठी ज्वारीचे तीन हजार तर मक्याचे २ हजार ५०० किलो बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यासाठी बाराशे शेतकºयांचे अर्जही आले आहेत. बियाणांचे वाटप सुरू असून आठ दिवसात ते पूर्ण होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असली तरी शेतकºयांच्या हितासाठी ती वाढविण्यात आली आहे. शेतकºयांनी अर्ज पशूधन दवाख्यान्यात सादर करावे, असे पथवे, भाबड, कातकाडे यांनी सांगितले.
अर्जासोबत साातबारा उतारा, आधार कार्ड व बॅँक पासबुक झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. एका शेतकºयाला दहा गुंठ्यासाठी ज्वारीचे ४ किलो अथवा मक्याचे ५ किलो बियाणे वितरित करण्यात येत आहे. थोडेफार पाणी शिल्लक असल्यास शेतकºयांना चारा तयार करता यावा व दुष्काळात पशूधनासाठी आधार मिळावा या हेतूने चाºयासाठी बियाणांचे वाटप केले जात आहे.