मालेगावी बालकांच्या उपचारासाठी ४८ खाटांचे नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:06+5:302021-06-03T04:12:06+5:30

पहिल्या लाटेतून देश सावरला असताना दुसरी लाट अती वेगाने पसरली. यात माेठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ...

Allocation of 48 beds for treatment of Malegaon children | मालेगावी बालकांच्या उपचारासाठी ४८ खाटांचे नियाेजन

मालेगावी बालकांच्या उपचारासाठी ४८ खाटांचे नियाेजन

googlenewsNext

पहिल्या लाटेतून देश सावरला असताना दुसरी लाट अती वेगाने पसरली. यात माेठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळत असताना केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डाॅ. के. विजयराघवन यांनी काेराेना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची धाेक्याची सूचना केली आहे. पहिल्या लाटेनंतर गाफील राहिलेल्या आराेग्य विभागाने तिसऱ्या लाटेतील धाेका लक्षात घेऊन उपचार नियाेजनावर भर दिला आहे. राज्य शासनाचे टास्क फाेर्सचे सदस्य डाॅ. शशांक जाेशी यांनी सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. सूचनेनुसार बेड, उपचार साहित्य, ऑक्सिजन, पुरेसा औषधसाठा, बालराेगतज्ज्ञ डाॅक्टरांचे पथक आदींचे नियाेजन हाेत आहे. दुसऱ्या लाटेत काेविड रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या मालेगाव सामान्य रुग्णालयातही बालकांसाठी बेडची व्यवस्था केली जात आहे. प्राथमिक स्वरुपात लक्षणे आढळणाऱ्या बालकांवर जनरल वाॅर्डमध्ये उपचार हाेतील. या वाॅर्डची क्षमता ३० बेडची असणार आहे. गंभीर लक्षणे असल्यास अती दक्षता विभागात सहा बेड सज्ज ठेवले जाणार आहेत. एक वर्षाआतील बालकांच्या उपचारासाठी १२ बेड तयार आहेत. रुग्णालयाने बेडसह वाॅर्ड तत्पर केले आहेत.

चाैकट –

सहा बालराेगतज्ज्ञांचे पथक

तिसऱ्या लाटेत लहान बालके बाधित हाेण्याचा धाेका आहे. हा धाेका ओळखून विशेष खबरदारी घेतली जात आहे. संभाव्य तिसरी लाट आलीच तर उपचारासाठी बालराेगतज्ज्ञांची आवश्यकता भासणार आहे. सामान्य रुग्णालयात सहा बालराेगतज्ज्ञ कार्यरत आहेत. यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. रुग्णसंख्या बघून उपचार सुविधा दिली जाणार आहे.

चाैकट –

उपचाराचे माेठे आव्हान

काेराेनावर मात करणारे कुठलेही ठाेस औषध अद्याप सापडलेले नाही. परिस्थितीनुरूप डाॅक्टर बाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. लहान बालकांची रोगप्रतिकारक्षमता पाहता त्यांना काेराेना संसर्ग झाल्यास ऑक्सिजन व औषधांची मात्रा ठरवून उपचार करण्याचे माेठे आव्हान बालराेगतज्ज्ञांना पेलावे लागणार आहेत.

कोट....

आराेग्य यंत्रणा सक्षम

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आराेग्य यंत्रणा सक्षम आहे. सध्या जनरल वाॅर्ड तयार झाला आहे. आयसीयू कक्षाचे कामही सुरू आहे. उपचाराच्या आनुषंगाने प्राप्त हाेणाऱ्या सूचना व निर्देशांचे पालन करून बालकांवर उपचार केले जातील.

- डाॅ. हितेश महाले, अतिरिक्त शल्याचिकित्सक, सामान्य रुग्णालय, मालेगाव

Web Title: Allocation of 48 beds for treatment of Malegaon children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.