सटाणा शहरात पालिकेकडून बाकड्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:48 PM2018-12-18T17:48:06+5:302018-12-18T17:48:19+5:30

सटाणा: येथील नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध चौक,मंदिर, रस्ते मोकळे भूखंड याठिकाणी बाकडे ठेवल्याने शहरातील वयोवृद्ध,जेष्ठ नागरीक व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संवाद साधावा याठी २४० बाकडे देण्यात आले. यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.

Allocation of baskets in city of Satana | सटाणा शहरात पालिकेकडून बाकड्यांचे वाटप

सटाणा शहरात पालिकेकडून बाकड्यांचे वाटप

googlenewsNext

सटाणा: येथील नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध चौक,मंदिर, रस्ते मोकळे भूखंड याठिकाणी बाकडे ठेवल्याने शहरातील वयोवृद्ध,जेष्ठ नागरीक व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संवाद साधावा याठी २४० बाकडे देण्यात आले. यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांची नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याकडे बाके देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव करून नगरसेवकांसाठी खास निधीची तरतूद करण्यात आली.
यावेळी भाजपा गटनेता महेश देवरे,नगरसेविका पुष्पा सूर्यवंशी, सभापती दीपक पाकळे,नगरसेवक मनोहर देवरे,माजी नगरसेवक साहेबराव खैरनार,कैलास देवरे,नितीन सोनवणे, भिका शेवाळे, बबलू पवार,स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.या कामी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बागुल, गतनेते राकेश खैरणार, नितिन सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती सुनीता मोरकर, राहुल पाटील, दीपक पाकळे,शमा मन्सूरी आरिफ शेख निर्मला भदाणे, नगरसेविका संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, रु पाली सोनवणे, सोनाली बैताडे, भारती सूर्यवंशी, सुवर्णा नंदाळे,सुरेखा बच्छाव, मुल्ला शमीम शिफक, लता सोनवणे, सुलोचना चव्हाण, विद्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांचे सहकार्य लाभले. (१८ सटाणा)

 

Web Title: Allocation of baskets in city of Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.