येवल्यात जिल्हा बॅँकेच्या शाखाधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Published: April 25, 2017 01:57 AM2017-04-25T01:57:26+5:302017-04-25T01:57:37+5:30
येवला : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील जब्रेश्वर शाखेत शिक्षकांना फक्त दोन हजार रु पयेच काढता येत आहेत.
येवला : शिक्षकांच्या पगाराची रक्कम खात्यावर जमा होऊनही जिल्हा बँकेच्या येथील जब्रेश्वर शाखेत शिक्षकांना फक्त दोन हजार रु पयेच काढता येत आहेत. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या जब्रेश्वररोड शाखेत शाखाधिकारी गंगाधर मोरे यांना घेराव घातला.
दोन दिवसात वेतनाची रक्कम न मिळाल्यास बँकेला टाळे ठोकून सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा मानस शिक्षक संघटनांच्या वतीने नवनाथ शिंदे, दिगंबर नारायणे यांनी व्यक्त केला. शिक्षकांना शाळेत थांबण्याऐवजी दररोज बँकेची पायरी चढावी लागत आहे. दरमहा वेतनाचे पैसा जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये जमा होत असताना हा पैसा नेमका मुरतो कुठे, असा सवाल यावेळी संतप्त शिक्षकांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापक दिनकर दाणे, पंडित मढवई, सुनील मेहेत्रे, ए. जे. नाठी, सतीश भावसार, रमेश पवार, दिलीप कचरे, नवनाथ उंडे, पी. एम. पैठणकर, सतीश भावसार, सुभाष पगारे, दत्तकुमार उटावळे, राजेंद्र पाखले, शरद ढोमसे, उत्तम बंड, पोपट शेवाळे, साहेबराव गायकवाड, सुनील गायकवाड, धर्मा कऱ्हे, महेश जगदाळे, युवराज धनकुटे, विजय आरणे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)