सिन्नरला निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 03:05 PM2019-10-20T15:05:07+5:302019-10-20T15:05:16+5:30
Maharashtra Assembly Election 2019 सिन्नर : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सर्वांना वेध लागले आहे मतदानाचे. सोमवारी होणा-या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे.
सिन्नर : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सर्वांना वेध लागले आहे मतदानाचे. सोमवारी होणाºया मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा ज्योती कावरे, तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मतदान साहित्य वाटप व संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. मतदार संघातील ३५४ मतदान केंद्रावर मतदान यंत्र पोहच करण्याची व्यवस्था तेथे करण्यात आली होती. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ४४ बसेस, ७ मिनीबस, ५ ट्रॅक, ५४ जीप, ४ कार अशी ११४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रासाठी ३५४ कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आणि ६५ व्ही. व्ही. पॅटही तयार ठेवण्यात आले असून रविवारी मतदान केंद्रावर सर्व साहित्य पोहच करण्यात आले. सिन्नर तालुक्यासह टाकेद गटातील एकूण ३५४ केंद्रावर प्रत्येक केंद्रासाठी १ मतदान केंद्र अध्यक्ष, तीन अधिकारी व १ शिपाई असे १७७० सेवक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत ५९ अरिक्ति अधिकारीही असणार आहेत. रविवार दि. २० रोजी सकाळी ८ वाजेपासूनच मतदान साहित्याचे वितरण करण्यास प्रारंभ करण्यात आला. साहित्य वितरणासाठी तहसील आवारात ३२ टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर ३ अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर सोमवार दि. २१ रोजी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर याच टेबलवर मतदान साहित्य जमा करण्याचे काम होणार आहे.