श्रमजीवी संघटनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:05 PM2020-04-09T23:05:12+5:302020-04-09T23:08:52+5:30
ग्रामीण आदिवासी भागातील मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी व टाकेहर्ष येथे केले.
वैतरणानगर : लॉकडाउनमुळे ग्रामीण आदिवासी भागातील मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी व टाकेहर्ष येथे केले. डहाळेवाडी व टाकेहर्ष येथील कातकरी समाजाच्या मजुरांना हाताला काम नाही, खायला अन्न २नाही अशा परिस्थितीत श्रमजीवी संघटना धावून आली. डहाळेवाडी येथील ३५ व टाकेहर्ष येथील ३० कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. विशेष म्हणजे लॉकडाउनमुळे वाहन उपलब्ध नसल्याने या युवकांनी बैलगाडी मधून गावोगावी जात धान्य वाटप केले. यावेळी भगवान डोखे, तानाजी शिदे, संतोष निरगुडे, सुरेश पुंजारे उपस्थित होते.