२,२७१ कोटींचे खरीप कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:12 PM2020-09-30T23:12:55+5:302020-10-01T01:14:32+5:30
नाशिक: खरीप हंगाम कर्ज वाटपात गेल्यावर्षीपेक्षा ६५८ कोटींचे अधिक कर्ज वाटप करीत बॅँकांनी चांगली कामगिरी केली असून गेल्या दहा-बारा वर्षात जिल्'ाने २२०० कोटींचा टप्पा प्रथमच ओलांडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
नाशिक: खरीप हंगाम कर्ज वाटपात गेल्यावर्षीपेक्षा ६५८ कोटींचे अधिक कर्ज वाटप करीत बॅँकांनी चांगली कामगिरी केली असून गेल्या दहा-बारा वर्षात जिल्'ाने २२०० कोटींचा टप्पा प्रथमच ओलांडला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
शेतकऱ्यांना खरीप कर्ज वाटप करण्यासाठी बॅँकांना ३३०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा २ हजार २७१ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप करीत जिल्'ाने चांगली कामगिरी केली. कर्ज वाटपाची एकुण टक्केवारी ६८.७४ टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी पेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे.
खरीप पीक कर्जासाठी देण्यात आलेल उद्दिष्टापैकी जिल्हा बँकेला ४३७ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४४३ कोटींचे कर्ज वाटप करण्यात जिल्हा बॅँकेने अडचणीच्या काळातही चांगली कामगिरी केली. बॅँक आॅफ महाराष्टÑाने ५७० पैकी ३८७ कोटींचे कर्ज वाटप केले तर स्टेट बॅँकेन ४८६ पैकी ३७३ कोटींचे कर्ज वाटप करून चांगली कामगिरी केली. इतर बॅँकांची कामगिरी देखील समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
खरीप कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३० सप्टेबर असल्याने बॅँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी यासाठी जिल्हाधिकाºयांनी दर आठवड्याला बॅँकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. त्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसून आला.
खरीब हंगाम कर्ज वितरणाच्या अखेरच्या दिवशी घेण्यात आलेल आढाव्यानुसार गेल्यावर्षीपेक्षा जिल्'ात ६५८ कोटींचे अधिक कर्ज वाटप करण्यात आल्याचे समोर आले. यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने महात्मा फुले कर्जमुक्तीचे पैसे जिल्'ाला उशीरा मिळाले होते.
महात्मा फुले कर्जमुक्ती
महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये सुरुवातला खूप मागे असलेल्या जिल्हा बॅँकेने २२१ कोटींपर्यंत मजल मारली आहे. राज्यातही पहिल्या चार पाच जिल्'ांमध्ये नाशिक जिल्हचा क्रमांक असलयची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली