कळवण न्यायालयात मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:15 PM2020-04-06T16:15:44+5:302020-04-06T16:17:06+5:30
कळवण : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
कळवण : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
विविध कामानिमित्ताने तालुक्यातील अनेक नागरीक कळवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात येत असतात. त्यामुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. हि बाब ओळखून समता परिषद कळवण तालुक्याच्यावतीने तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याने न्यायाधीश एस. एस. पारखी यांच्या प्रमुख उपस्थित कर्मचाºयांना वापट करण्यात आले.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संजय पवार, अॅड. धनंजय पाटील, अॅड. तुषार शिंदे, प्रविण गांगुर्डे, कैलास पाटील, प्रकाश आहेर, प्रफुल बागुल, नंदु जाधव तसेच न्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.