मालेगाव मनपात बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:13 PM2020-03-10T17:13:04+5:302020-03-10T17:13:56+5:30
मालेगाव : महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मनपाच्या जुन्या महासभा सभागृहात ३५ महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे फिरता निधी व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहूणे म्हणून उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी अलका भावसार, शीद्रा शफिक अहमद आदि उपस्थित होते. यावेळी प्रथम ५० बचत गटांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच ३५ बचत गटांना १० हजार प्रमाणे फिरत्या निधीचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहूणे डॉ. अलका भावसार यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व कोरोना विषाणूबाबत महिलांना मार्गदर्शन केले. उपायुक्त (कर) रोहिदास दोरकुळकर, सनदी लेखापरीक्षक शीद्रा शफिक अहमद यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मीना बोरसे, कल्पना सोनपसारे, हिरकणी वाबळे, मधुर संसारे, ओबेद शेख, नितीन महाजन, बेबीनंदा मुळे, शाहीन शेख, दिलीप कळमकर, फरहान काझी, वर्षा हिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन शहर अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर यांनी तर आभार बेबीनंदा मुळे यांनी मानले.