इनरव्हीलतर्फे सुरक्षा साधनांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:21 PM2020-05-08T22:21:15+5:302020-05-09T00:04:01+5:30

मालेगाव : येथील इनरव्हील प्रांत ३०३ तर्फे कोरोनाशी प्रत्यक्ष लढणाऱ्या आशा वर्करसाठी पाचशे ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले. मालेगावात कोरोनाचा कहर वाढत असताना सुरक्षा साधनांची कमतरता जाणवत आहे.

 Allocation of safety equipment by Inner Wheel | इनरव्हीलतर्फे सुरक्षा साधनांचे वाटप

इनरव्हीलतर्फे सुरक्षा साधनांचे वाटप

Next

मालेगाव : येथील इनरव्हील प्रांत ३०३ तर्फे कोरोनाशी प्रत्यक्ष लढणाऱ्या आशा वर्करसाठी पाचशे ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले.
मालेगावात कोरोनाचा कहर वाढत असताना सुरक्षा साधनांची कमतरता जाणवत आहे. विशेषत: घरोघर जाऊन रुग्णांची माहिती गोळा करणाºया आशा वर्कर व एएनएम यांना या सुरक्षा साधनांची गरज आहे. आरोग्य सेवा देणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय इनरव्हील संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याकडे ‘फेस शिल्ड’ सुपूर्द करण्यात आले.
क्लबच्या पूर्व प्रांत चेअरमन डॉ. अलका भावसार, नाशिक येथील पूर्व प्रांत चेअरमन प्रेरणा बेले व प्रांत वैजंयती पाठक यांनी यासाठी प्रयत्न केले. यावेळी आरोग्य अधिकारी सपना ठाकरे, इनरव्हील प्रांत कोषाध्यक्ष, गिरीशा ठाकरे, क्लब सेक्रेटरी संगीता परदेशी, क्लब कोषाध्यक्ष कांता भोसले व रोटेरिअन डॉ. दिलीप भावसार उपस्थित होते.

Web Title:  Allocation of safety equipment by Inner Wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक