कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:21 PM2020-04-17T20:21:35+5:302020-04-18T00:30:04+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांना दक्षता घेण्यासाठी चौदा दिवस पुरेल इतका मुबलक सॅनिटायझरचा पुरवठा करून कोरोनासोबत मुकाबला करणाºया कर्मचाºयांचे बळ वाढविण्यात आले.
पाथरे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांना दक्षता घेण्यासाठी चौदा दिवस पुरेल इतका मुबलक सॅनिटायझरचा पुरवठा करून कोरोनासोबत मुकाबला करणाºया कर्मचाºयांचे बळ वाढविण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ही राष्ट्रीय आपत्ती असून ती तालुक्यापर्यंत पोहचल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्व नागरिकांना जागरुकतेचे व दक्षतेचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनीही सर्व नागरिकांना आरोग्याबाबत काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या. सिन्नर तालुक्यातील पूर्वेकडील पाथरे गावात कोरोना रुग्ण आढळल्याने या संकटाचा धैर्याने सामना करण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी यांना सलग १४ दिवस पुरेल इतके सॅनिटायझर घुमरे यांनी दिले. वारेगाव, पाथरे बु, पाथरे खुर्द आणि कोळगाव माळ या ठिकाणी सर्वेक्षण आणि दक्षतेसाठी तैनात आहे. या सर्वांसाठी सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे यांनी स्वखर्चाने सलग १४ दिवस वापरता येईल इतके सॅनिटायझरचे वाटप केले. यापूर्वीच पाथरे बु, पाथरे खुर्द, तसेच वारेगाव या तिन्हीही ग्रामपंचायतींनीही सॅनिटायझर खरेदी करून प्रत्येक घरोघरी वाटप केलेले आहे. पथकातील आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या नाश्त्याची सोय पाथरे सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. पाथरे खुर्दचे उपसरपंच पप्पू गुंजाळ व संपत चिने यांनी या सर्व कर्मचाºयांना शुद्ध पाणी, आणि फल आहाराचे नियोजन केले आहे. सॅनिटायझर वाटप डॉ. मोहन बच्छाव, डॉ. अजिंंक्य वैद्य, सहायक पोलीस निरीक्षक गलांडे व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना सॅनिटायझरचे वाटप केले.