शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकांचे शाळांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:56 PM2018-05-04T14:56:44+5:302018-05-04T14:56:44+5:30

शिक्षण विभागाकडून 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे शुक्रवारपासून शहरातील विविध शाळांना (दि.4) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सर्व शाळांना प्रवेश प्रक्रियेच्या सर्व माहिती पुस्तिकांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 10 मे पासून माहिती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे

Allocation of schools to Eleventh Entrance Books by Education Department | शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकांचे शाळांना वाटप

शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकांचे शाळांना वाटप

Next
ठळक मुद्देअकरावी प्रवेश पुस्तिकांचे शाळांना वाटप 10 मेपासून विद्यार्थ्यांना विक्री करता येणार शाळांना विद्यार्थी पालक सभा घेण्याच्या सूचना

नाशिक : शिक्षण विभागाकडून 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे शुक्रवारपासून शहरातील विविध शाळांना (दि.4) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सर्व शाळांना प्रवेश प्रक्रियेच्या सर्व माहिती पुस्तिकांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 10 मे पासून माहिती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयांकडून शहरातील शाळांना पुस्तीका मिळाल्या असल्या तरी या माहीती पुस्तिकांची विद्यार्थ्यांना विक्री करण्यापूर्वी संबधित शाळांनी विद्यार्थी, पालक व शिक्षक सभा घेऊन विद्याथ्र्याना प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणे अनिवार्य करण्यात आले आले. अशाप्रकारे सभेतून विद्यार्थी व पालकांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती दिल्यानंतर संबधित शाळांना सभेचा इतिवृत्त अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करावी लागणार आहे. तयानंतरच माहिती पुस्तकांची विक्री करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शाळांकडून 10 मे पूर्वी अशाप्रकारे विद्यार्थी, पालक व शिक्षक सभा घेऊन त्यानंतरच माहिती पुस्तिकांची विक्री करण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची नियमावली, प्रवेश फे ऱ्या, मार्गदर्शन केंद्र अशी सर्व माहिती माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहे. यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील 57 महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यात 27 हजार 500 जागा उपलब्ध आहेत. शहरात यावर्षी तीन नवीन कॉलेज सुरू झाले नवीन महाविद्यालयांमधील व वाढीव तुकडय़ांच्या माध्यमातून विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा वाढणार आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकडय़ा घेतल्या असल्याने विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी वाढीव जागा उपलब्ध होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत विविध शाळांना शुक्रवारपासून माहिती पुस्तिकांचे वाटप सुरु झाले आहे. माध्यमिक शाळांनी त्यांच्या पटसंख्येनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 10 मे पासून माहिती पुस्तिकांची विक्री करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेकडून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यानुसारच शाळांना माहिती पुस्तकारचे वितरण करण्यात आले आहे. सीबीएसई व आयसीएसई सारख्या अन्य मंडळाच्या शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून द्यावयाच्या असतील तर त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Allocation of schools to Eleventh Entrance Books by Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.