पुढच्या आठवड्यात विषय समित्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 07:39 PM2020-01-06T19:39:51+5:302020-01-06T19:40:09+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक गुरुवारी (दि. २) पार पडून अध्यक्षपदी सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी शुक्रवारी विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होऊन तीनही विषय

Allocation of topic committees next week | पुढच्या आठवड्यात विषय समित्यांचे वाटप

पुढच्या आठवड्यात विषय समित्यांचे वाटप

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेची विशेष सभा : पदाधिकाऱ्यांचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप व त्यापाठोपाठ समित्यांच्या पुनर्रचनेसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून, सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून कामकाजाला सुरुवात केली आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक गुरुवारी (दि. २) पार पडून अध्यक्षपदी सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी शुक्रवारी विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होऊन तीनही विषय समित्यांचे सभापतिपद महाआघाडीच्या म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या ताब्यात गेले. या निवडणुकीतून भाजपला हद्दपार करण्यात आले. विषय समित्यांच्या बालकल्याण समितीच्या सभापतिपदी कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर, तर समाजकल्याण समितीच्या सभापतिपदी सेनेच्या सुशीला मेंगाळ यांची निवड करण्यात आली. अन्य दोन समित्यांसाठी संजय बनकर व सुरेखा दराडे यांची निवड करण्यात आली असली तरी, या दोघांसह उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड या तिघांना अद्यापही समित्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन अशा या तीन समित्या असून, या समित्यांचे वाटप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले जाते. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी त्यासाठी येत्या १४ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. या सभेत समित्यांचे वाटप होण्याबरोबरच, विविध समित्यांचे रिक्त असलेली सदस्यपदेही भरली जाणार आहेत. तत्पूर्वी येत्या १३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा बोलाविण्यात आली आहे.

Web Title: Allocation of topic committees next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.