ब्राह्मणगावी शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:33 PM2019-07-11T18:33:22+5:302019-07-11T18:33:48+5:30
ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवशंभू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मोफत प्राचीन नाणी तसेच पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
ब्राह्मणगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवशंभू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मोफत प्राचीन
नाणी तसेच पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
नेहमीच सामाजिक, शैक्षणिक कार्यात योगदान देणारे शिवशंभू फ्रेंड सर्कलने शाळेतील पाच निराधार विद्यार्थ्यांचा शालेय शैक्षणिक स्टेशनरी २२खर्च करणार असल्याचे
शिव शंभू फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष
रोहित मालपाणी यांनी सांगितले तर या निराधार विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, कंपास, वही व सर्व शालेय साहित्य देण्यात आले.
यासाठी राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतिष्ठित
व्यापारी लक्ष्मीनारायण मुंदडा
यांचे आर्थिक सहकार्य लाभले. त्यानंतर अमेचर क्लब बागलाणचे मयूर जाधव, देवा जगताप यांनी
एक छंद म्हणून ही प्राचीन नाणी
व पोस्टाची तिकिटे जोपासली
आहेत.
त्यात देशी, विदेशी, पुरातन असे अनेक प्रकार आहेत. त्याचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले. जाधव व जगताप यांनी सर्व जुन्या नोटांची व नाण्यांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.