भऊर येथे महिलांना गॅस संचाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:26 AM2018-04-21T00:26:51+5:302018-04-21T00:26:51+5:30
महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे सरव्यवस्थापक बी. सुंदरबाबू यांनी भऊर येथे दिली.
देवळा : महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना सुरू केली असून, आठ कोटी कुटुंबांना या योजनेद्वारे गॅस संचाचे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे सरव्यवस्थापक बी. सुंदरबाबू यांनी भऊर येथे दिली. उज्ज्वला दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते. देवळा तालुक्यातील भऊर येथे शुक्रवारी (दि.२०) उज्ज्वला दिनाचे औचित्य साधून ६० लाभार्थींना गॅस संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी ओम गुरुदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी उपस्थित महिलांना आरोग्य सुरक्षा व इंधन बचावासाठी मार्गदर्शन केले. यावेळी लाभार्थी महिलांनी गॅस संच हाताळणी व अनुभव याविषयी प्रात्यक्षिक सादर करून मनोगत व्यक्त केले. यावेळी रिटेल युनिटचे व्यवस्थापक अनुरंजन शेट्टी, गटविकास अधिकारी महेश पाटील, सरपंच दादाजी मोरे, बाळासाहेब गुंजाळ, बाबा पवार, सुनील पवार, तुषार पाटील, आनंद पाटील, कीर्ती केदारे, मिलिंद पवार, दीपक सोनवणे, दीपक पवार, सचिन पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.