गिरणारे येथे उज्ज्वला दिनी घरगुती गॅसजोडणीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:58 AM2018-04-27T00:58:47+5:302018-04-27T00:58:47+5:30
गंगापूर : गिरणारे येथे उज्ज्वला दिनानिमित्त प्रधानमंत्री एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.
गंगापूर : गिरणारे येथे उज्ज्वला दिनानिमित्त प्रधानमंत्री एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने गिरणारे ग्रामपंचायत व स्थानिक गॅस एजन्सीच्या वतीने पंचक्र ोशितील गावातील महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवयानी फरांदे होत्या. सरपंच अलका दिवे, उपसरपंच तानाजी गायकर,भाजपा शहर उपाध्यक्ष अनिल भालेराव, महिला व बाल कल्याण सभापती सरोज आहिरे, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या प्रितम आव्हाड, नितीन गायकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थेटे, आत्माराम थेटे, संजय सूर्यवंशी, विजय पोटिंदे, अशोक दिवे, नलिनी थेटे, ग्रामविकास अधिकारी बी. राजगुरू, गॅस एजन्सीचे विष्णू थेटे, गोरख थेटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार फरांदे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वामुळे महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. महिलांना होणारा त्रास कमी झाला आहे. यापुढे त्यांना स्वयंपाक करणे सोयीचे होणार आहे. हा क्षण भाग्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सेनेची गैर हजेरी
कार्यक्र माचे प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांना मान देण्यात आला होता. परंतु भाजपाचा कार्यक्र म असल्याने त्यांनी उपस्थिती टाळली अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. गिरणारे गाव हे बबनराव घोलप यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मुलाने अर्थात आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित न राहिल्याने गावातील नागरिकांमध्ये नाराजी उमटल्याचे चित्र होते.