कुटुंबाच्या सहमतीने जमिनीची वाटणी झाली सोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 07:40 PM2019-12-09T19:40:49+5:302019-12-09T19:44:48+5:30
खातेफोड करून जमिनीचे वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जाते. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसते. पण जमिनीची विभागणी करून सातबारा उताºयावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखावू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कुटुंबातील जमिनीचे वाटप करताना कुटुंबातील सर्वांची सहमती असल्यास आता केवळ अर्ज आणि कच्चा नकाशा दिल्यास हिश्शाचे वाटप होणार आहे. त्यामुळे जमीन मोजणीपासून प्रत्यक्ष सातबारा उताऱ्यात नाव नोंदविण्यापर्यंतच्या किचकट प्रक्रियेला फाटा देण्यात आला आहे. राज्याच्या जमाबंदी आयुक्त सेतुराम चोक्कलिंगम यांनी निर्णय घेतला असल्याने राज्यातील लाखो कुटुंबातील पोटहिश्शाचे वाटप सोपे झाले आहे.
खातेफोड करून जमिनीचे वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जाते. हे वाटप करताना कुटुंबातील कोणाचीही हरकत नसते. पण जमिनीची विभागणी करून सातबारा उताºयावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखावू आणि किचकट असल्यामुळे अनेक कुटुंबातील जमिनींचे वाटप होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी परिपत्रक काढून ही प्रक्रिया सोपी केली आहे. या निर्णयानुसार कुटुंबातील सर्व नोतवाइकांसाठी सहमती असल्यास त्यांनी सर्वांच्या स्वाक्षºया असलेला अर्ज करायचा आहे. त्यानंतर नातेवाइकांपैकी कोणाला कोणत्या दिशेचा हिस्सा हवा आहे, याचा कच्चा नकाशा द्यावा लागणार आहे. त्यावरून जमिनीची वाटणी केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिंदे यांनी कळविले आहे.