सुवर्ण जयंती अभियान २०१९ अंतर्गत शिबिरात दाखले, रेशन कार्डांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 05:54 PM2019-12-19T17:54:52+5:302019-12-19T17:55:16+5:30
कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शासकीय दाखल्यांचे वितरण व्हावे विद्यार्थी पालक यांचा वेळ व श्रम वाचेल भविष्यात महाविद्यालयीन प्रवेशावेळी अडचण येऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोकणंगाव : (ता. निफाड) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्र तसेच नागरिकांना रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १००० रुपये प्रती महिना मंजुरी संदर्भातील आदेश प्रमाणपत्र निफाड तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
विद्यार्थ्यांना मोफत शासकीय दाखल्यांचे वितरण व्हावे विद्यार्थी पालक यांचा वेळ व श्रम वाचेल भविष्यात महाविद्यालयीन प्रवेशावेळी अडचण येऊ नये यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे मंडल अधिकारी तांबे ओझर मंडलातील सर्व तलाठी वृषाली नागोरे, सरिता वाघ, गिता कनोज, कल्पना पवार, तात्या देशमुख, कृषी अधिकारी राठोड, वैद्यकीय अधिकारी तमनर, ग्रामविकास अधिकारी अभिजित तुपे, बापुसाहेब आहिरे, मुख्याध्यापक पवार, पडोळ, राजेश शिरापुरे, विकास महाले, सरपंच अंबादास गांगुंर्डे, उपसरपंच भारत मोरे, साकोराचे उपसरपंच अनिल बोरस्त,े चेअरमन वाळु मोरे, व्हा चेअरमन शरद गायकवाड, नाना तिडके, बापु मोरे, जगन्नाथ मोरे, अतुल गायकवाड ,नाना गायकवाड, संतोष गवळी, माणिक जाधव, परशराम मोरे, आदी उपस्थित होते.
(फोटो १९ कोकणगाव)