आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 02:20 PM2019-07-08T14:20:55+5:302019-07-08T14:25:27+5:30
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उधाण युवा ग्रुपतर्फे ‘एक दप्तर मोलाचे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत उधान ग्रूपने नाशिक - पालघर जिल्हयाच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील तोरंगण गावासह परिसरातील मेटकावरा व हेदपाडा येथील जिल्हापरिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व दप्तर, वह्या, पुस्तके, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप केले.
नाशिक : सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उधाण युवा ग्रुपतर्फे ‘एक दप्तर मोलाचे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत उधान ग्रूपने नाशिक - पालघर जिल्हयाच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील तोरंगण गावासह परिसरातील मेटकावरा व हेदपाडा येथील जिल्हापरिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व दप्तर, वह्या, पुस्तके, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप केले.
आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील दोन महिन्यापासून उधाण युवा ग्रुपने ‘एक दप्तर मोलाचे’ या शिर्षकाखाली सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचे नंतर एका चळवळीत रूपांतर झाले. या चळवळीला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक, संगीत, आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनीही चित्रफीतीद्वारे नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करीत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. सोशल मीडियावरही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. उधाण युवा ग्रुप अध्यक्ष जगदिश बोडके , तोरंगन गाव सरपंच माया जाधव, आरबी स्कूल चे संचालक भूषण सोनार, उपसरपंच प्रशांत बेंडकोळी, अशासकीय सदस्य आदिवासी उपयोजना समिती विनोद डेंगळे , सुवर्णा सांगळे, पूजा वाडेकर ,मिना बोरा,शाळेचे केंद्र ्रमुख्यधापक गोपाळ मैंद यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आदीवासी पाड्यातील व अतिदुर्गम भागातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी उधानग्रूपने लोकसहभागातून ही चळवळ उभी केली असून आगामी काळात आदिवासांच्या शिक्षणासाठी ही चळवळ आणखी व्यापक करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे उधाण युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांनी सांगितले.