विधान परिषदेसाठी रविवारी मतदान साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:06 PM2018-05-19T16:06:28+5:302018-05-19T16:06:28+5:30
गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे २४ तास शिल्लक राहिले असून, त्यादृष्टीने प्रशासनाने सारी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मालेगाव व नाशिक महापलिकेतील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, न
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासनाची तयारी पुर्ण झाली आहे. मतदानासाठी रविवारी सकाळी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, या निवडणुकीत निर्माण झालेली राजकीय चुरस पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मतदान केंद्राचा ताबा पोलिसांकडे देण्यात येणार आहे.
गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे २४ तास शिल्लक राहिले असून, त्यादृष्टीने प्रशासनाने सारी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मालेगाव व नाशिक महापलिकेतील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपरिषद, नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच कॅन्टोंमेंट बोर्डाचे सदस्यांना मतदानाचा हक्क असून,त्यांची संख्या जिल्ह्यात ६४४ आहे. यातील एका सदस्याच्या निधनामुळे पद रिक्त झाले आहे. या मतदारांसाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. त्या त्या तालुक्यातील नगरसेवकांना व सदस्यांना तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मतदान केंद्र असून, नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना कार्यालयात ही व्यवस्था असेल. या साठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह सहा कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर पसंतीक्रम मतदारांना नोंदवायचा असून, त्यासाठी मतदान केंद्राध्यक्षांकडे असलेला पेनचाच वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या शिवाय भ्रमणध्वनी, पेजर, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या वस्तुंना पुर्णत: बंदी घालण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाºयांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यात मतपेटीसह मतपत्रिका, पेन, सील करण्याचे साहित्य, विविध प्रकारचे अर्ज अशा सुमारे ४३ प्रकारच्या वस्तुंचा समावेश असेल. या साहित्याचा वापर व त्यासाठी घ्यावयाची खबरदारीबाबत मतदान कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत मतदान केंदे तयार करण्यात येतील व मतदान कर्मचाºयांना केंद्रावरच मुक्काम करावा लागणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ होईल.