जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे बिनविरोध वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:33 PM2020-01-14T19:33:51+5:302020-01-14T19:34:08+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती.

Allotment of Zilla Parishad Subject Committees | जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे बिनविरोध वाटप

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे बिनविरोध वाटप

Next
ठळक मुद्देगायकवाड : बांधकाम, बनकर : कृषी तर दराडेंकडे शिक्षण, आरोग्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या जागा मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध वाटप करण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम तर संजय बनकर यांना कृषी व पशुसंवर्धन समिती तसेच सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती देण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली. या सभेत विषय समित्यांच्या ३१ रिक्त जागांपैकी २८ जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.


जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. त्यासाठी सकाळी अकरा वाजेपासून विषय समित्यांसाठी नामांकन दाखल करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. प्रत्यक्षात दुपारी दोन वाजता सभेचे कामकाज सुरू होऊन विषय समित्यांचे वाटप होणे अपेक्षित असले तरी, स्थायी समितीसह बांधकाम व अर्थ समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने त्या संदर्भातील तडजोडी, गुप्त बैठका व डावपेच आखण्यातच अधिक वेळ गेला. बैठकांवर बैठका होऊनही एकमत होत नसल्याने सभेच्या कामकाजाची वेळ पुढे ढकलावी लागली. अखेर दुपारी तीन वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यात प्रारंभी सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तशी घोषणा केली. त्यात उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम समिती, संजय बनकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती देण्यात आली.
पदाधिकाºयांना समित्यांचे वाटप करण्यात आल्यानंतर स्थायी समितीच्या दोन रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र दोन जागांसाठी ज्ञानेश्वर जगताप, लता विलास बच्छाव, छाया गोतरणे व महेंद्र काले या चौघांचे अर्ज दाखल झाल्याने त्यातील जगताप व बच्छाव यांनी माघार घेतल्याने गोतरणे, काले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या दोन जागांसाठीदेखील चौघांनी अर्ज दाखल केले होते. त्यात लता बच्छाव व मनीषा पवार या दोघांनी माघार घेतल्याने दीपक शिरसाठ व यशवंत शिरसाठ या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

Web Title: Allotment of Zilla Parishad Subject Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.