वीजबिल हप्त्याने भरण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:38+5:302021-07-29T04:15:38+5:30
गेल्या २ वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीत व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर, अनेकांनी नव्या उभारीने नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. या ...
गेल्या २ वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीत व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर, अनेकांनी नव्या उभारीने नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. या काळात अनेकांना वीजबिल जास्त आकारण्यात आले, तर अनेकांनी लाइटबिल भरले नसल्याने त्यांना महावितरणने भरमसाट चक्रवाढव्याज लावत अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठवली आहे. यात अनेक जण वीजबिल भरण्यासाठी तयार असून त्यांना दोन टप्प्यांत किंवा हप्तास्वरूपात त्यांचे वीजबिल भरून घ्यावे. विद्युत महावितरण कंपनी सटाणा शहरात व तालुक्यात मनमानी करत दंडेलशाही पद्धतीने वीजग्राहकांकडून सक्तीची वीजबिले वसुली करत आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हजार किंवा दोन हजार रुपये लाइटबिल थकले असेल तर अशा ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे विद्युतकनेक्शन खंडित करण्यात येत आहे. कोरोना महामारीत शाळा बंद असल्याकारणाने विद्यार्थी घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. वीजकनेक्शन खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
कोरोनासारख्या महामारीत गोरगरीब जनतेला विद्युतबिल थकले असेल तर त्यांचे विद्युतकनेक्शन खंडित करण्यात येऊ नये व थकीत ग्राहकांना आपण आपल्या स्तरावरून हप्ते करून वीजबिले भरून घ्यावीत. असे न केल्यास आंदोलन छेडण्याचे निवेदन माजी नगरसेवक मनोज सोनवणे, आरपीआय शहराध्यक्ष भारत बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते सागर सोनवणे, अनिल सोनवणे, ईश्वर सरदार, परेश देवरे, आदिल मुल्ला, राहुल शेलार, हर्षद जाधव, अभिषेक हेडा, शोएब अत्तार, प्रज्वल भामरे, शुभम बोरसे, मनोज ठोळे, गुलाब हिरे, प्रसाद अमृतकार, राकेश सोनवणे, दीपक अहिरे, शुभम मोरे, योगेश सोनवणे, स्वप्निल सोनवणे, मंगेश जाधव, गौरव पवार, धीरज मुसळे आदींनी महावितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता नितीन पाटील यांना दिले आहे.
फोटो : २८ सटाणा लाइट
कार्यकारी उपअभियंता नितीन पाटील यांना निवेदन देताना माजी नगरसेवक मनोज सोनवणे, आरपीआय शहराध्यक्ष भारत बच्छाव, सागर सोनवणे, ईश्वर सरदार, राहुल शेलार आदी.
280721\28nsk_37_28072021_13.jpg
फोटो : २८ सटाणा लाइट कार्यकारी उपअभियंता नितीन पाटील यांना निवेदन देताना माजी नगर सेवक मनोज सोनवणे, आर पी आय शहराध्यक्ष भारत बच्छाव, सागर सोनवणे, ईश्वर सरदार, राहुल शेलार आदी