सलून सुरू करण्यास परवानगी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:40 PM2020-06-10T22:40:35+5:302020-06-11T00:52:36+5:30
नाशिक : कोरोनामुळे मागील ८० दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेशहरातील विविध भागात दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नाशिक : कोरोनामुळे मागील ८० दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेशहरातील विविध भागात दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नाशिकरोड सुमारे दोन महिन्यांपासून बंद असलेला सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे नाशिकरोड येथे बुधवारी सलून व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर फलक लावून आंदोलन केले. राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेकोरोनामुळे सलून व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात निषेध दिन पाळण्यात आला. नाशिकरोड येथे सलून व्यावसायिकांनी दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला. शासनाने लवकरच सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये नाभिक समाज युवा अध्यक्ष राहुल तुपे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, बाळासाहेब पगारे, यशवंत निकम, शुभम पगारे आदी सहभागी झाले होते.
सातपूर परिसर नाभिक मंडळाच्या वतीने सातपूर गावातील पप्पाज फेटा दुकानाजवळ आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नाभिक समाजाला अपशब्द बोलल्याबद्दल विवेक लांबे यास त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व नाना वाघ, दीपक निर्वाण यांनी केले. यावेळी गोपी सैंदाणे, वासू निकम, विकास पगारे, संदीप डाके, राजू सोनवणे, कैलास कणसे, संदीप वाघचौरे, विकास सोनवणे, आदींसह सलून व्यावसायिक व समाज बांधव सहभागी झाले होते.