रविवारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:07+5:302021-03-13T04:27:07+5:30
नाभिक समाजाचा व्यवसाय अन्य दिवसांच्या तुलनेत फक्त रविवारी जास्त प्रमाणात असतो. मात्र रविवारीच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने ...
नाभिक समाजाचा व्यवसाय अन्य दिवसांच्या तुलनेत फक्त रविवारी जास्त प्रमाणात असतो. मात्र रविवारीच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. यामुळे सलून व ब्यूटिपार्लर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. यापूर्वीसुध्दा सहा-सात महिन्यांपर्यंत सलून बंद राहिल्याने कारागिरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. आता पुन्हा रविवारी लॉकडाऊन झाल्यास सलून व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
अगोदरच हातावर पोट असलेल्या कारागिरांची स्थिती गंभीर आहे. ते अधिक अडचणीत येऊ शकतात. म्हणून सर्व अटी-शर्तींसह रविवारी सलून व पार्लर व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, सलूनमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी न होऊ देता आम्ही सुरक्षिततेचे नियम पाळून व्यवसाय करू, अशी ग्वाही निवेदनात देण्यात आली आहे. निवेदनावर विशेष निमंत्रित सदस्य नारायणराव यादव, प्रदेश उपाध्यक्ष अशोक सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष संजय गायकवाड, विभागीय कार्याध्यक्ष अरुण सैंदाणे, संगीता मगर, गणेश जाधव, राजेंद्र कोरडे, सुरेश सूर्यवंशी, नाना वाघ, वैशाली सैंदाणे, रमेश आहेर, संतोष वाघ, ज्ञानेश्वर बोराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी, प्रतिभा सूर्यवंशी, अशोक ईशी, किरण शिंदे, दिलीप बोरसे, संतोष रायकर, सुनील कदम, नितीन वाघ, तुषार बिडवे, अशोक ईशी, सुरेश चित्ते, सोमनाथ शिंदे, कारण सूर्यवंशी, करण शिंदे, शिरीष जांभळे. अजय निकम, ऋषिकेश कदम, प्रेम भदाणे आदी उपस्थित होते.
===Photopath===
120321\12nsk_33_12032021_13.jpg
===Caption===
रविवारी सलुन दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी या माणीचे निवेदन जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांना देतांना संजय गायकवाड,ज्ञानेश्वर वाघ, पल्लवी मगर.