शहरवासीयांना ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:59+5:302020-12-03T04:25:59+5:30

लखमापूर : ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवणपद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. ...

The allure of millet bread on the stove in rural areas to the townspeople | शहरवासीयांना ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण

शहरवासीयांना ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण

Next

लखमापूर : ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवणपद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. आता हिवाळा सुरू झाल्याने शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण लागले आहे.

हिवाळा म्हटला की, बरेच जण उबदार व पौष्टिक आहाराचे सेवन करतात. काहीजण काजू, बदामला प्राधान्य देतात. परंतु ग्रामीण भागात इतक्या महागड्या खाद्याला कमी लोकांकडून पसंती दिली जाते. परंतु हिवाळ्यात ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग ऊब तयार व्हावी, यासाठी काही धान्याची निवड करतात. त्यामध्ये उडीद, बाजरी, ज्वारी आदी धान्याचा समावेश असतो. परंतु शेतकरीवर्गाला हिवाळ्यात ऊब देणारी भाकरी म्हणजे चुलीवरची खरपूस बाजरीची भाकर. बाजरीची भाकर ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महिला तीन दगडांची चूल अथवा मातीपासून तयार केलेली चूल यावर मोठा तवा ठेवून लाकडी परातीमध्ये बाजरीचे पीठ मिसळून गरम गरम बाजरीची भाकर तयार करतात. विशेष म्हणजे चुलीवरच्या भाकरीवर जो पापुद्रा येतो त़ो खाण्याची मजा काही वेगळाच आनंद देऊन जातो.

सध्या फक्त ग्रामीण भागातच चूल पाहायला मिळते. शहरी भागात मातीच्या चुलीची जागा गॅसने घेतल्यामुळे शहरातील महिला चुलीवरची भाकरी बनविणे तर सोडा; पण त्या खाणेसुद्धा पसंत करीत नाहीत. खेड्यात बाजरीच्या भाकरीला हिवाळ्यात सुगीचे दिवस येतात. कारण थंडीत मोठ्या प्रमाणात ऊब बाजरीच्या भाकरीतून मिळत असल्याने बळीराजा या भाकरीला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतो. परंतु बाजरीची भाकर खाण्यामागचे विज्ञान समजल्यामुळे आता शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या गरम गरम बाजरीच्या भाकरीचे आकर्षण वाटू लागले आहे. शेतकऱ्यांकडून बाजरीचे पीक घेण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने भविष्यात बाजरी मिळणे कठीण होते की काय, असा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे.

फोटो - ०२ लखमापूर १

Web Title: The allure of millet bread on the stove in rural areas to the townspeople

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.