देवगावी आवणीच्या कामांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 08:37 PM2020-07-09T20:37:07+5:302020-07-10T00:26:32+5:30
देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
देवगाव परिसरासह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेंट, डहाळेवाडी,टाकेहर्षे या भागात दमदार पावसामुळे आवणींच्या कामाला सुरुवात झाली असून मजूर टंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी वाडीपाड्यातील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीत वाढ केल्याने शेतकºयांत चिंता व्यक्त होत आहे. दरदिवसाला २५० रुपये मजुरी होती. परंतू, लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने आता ३०० रुपये मजुरी झाली आहे. मजुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला असून घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीच्या कामांवर जोर दिला जात आहे.
देवगाव परिसरात नागली, वरई, भात या मुख्य पिकांसह कोलम,
एक हजार आठ, रुपाली, सोनम,
एक हजार दफ्तरी या भातांच्या जातीची लागवड केली जाते. उशिरा पण समाधानकारक पाऊस पडत असल्याने व वेळेवर शेतकºयांनी
पेरणी केल्यामुळे भात लावणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर देवगाव परिसरातील सर्वच खेड्यापाड्यांत लावणीच्या कामांना वेग आला आहे.
------------------
दरवर्षीप्रमाणे भात आवणीसाठी पन्नास ते साठ मजूर घेत होतो.परंतू, चालुवर्षी लॉकडाऊनमूळे मजुरी वाढल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. मजुरी वाढल्याने व मजूर मिळत नसल्याने घरातील उपलब्ध माणसांना घेऊन आवणी करावी लागत आहे.
- दिलीप शिंदे, शेतकरी, देवगाव.
--------------
लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून हाताला काम नव्हते. परंतु, पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. मजुरी वाढवल्याने नक्कीच समाधान झाले आहे.
- सुरेखा दोंदे, मजूर, देवगाव