सुगरणींची घरटे बनविण्याची लगबग...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:34 PM2020-08-19T21:34:02+5:302020-08-20T00:15:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव निंबायती : खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कामगिरी जरा देख रे मानसा ! अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला ! या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या रानोमाळी येत आहे. सध्या विणीचा हंगाम सुरू असल्याने झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर, तर पाण्यात डोकावणाऱ्या फांद्यांवर मनमोहक जाळीदार नक्षीकाम केलेले घरटे विणण्यात सुगरण पक्षी सध्या मग्न असलेला आपल्याला पहावयास मिळत आहेत.

Almost to build a nest of sugarcane ...! | सुगरणींची घरटे बनविण्याची लगबग...!

सुगरणींची घरटे बनविण्याची लगबग...!

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव : पाखराची कामगिरी जरा देख रे मानसा..; मनमोहक जाळीदार नक्षीकामाचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव निंबायती :
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कामगिरी
जरा देख रे मानसा !
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला !
या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या रानोमाळी येत आहे. सध्या विणीचा हंगाम सुरू असल्याने झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर, तर पाण्यात डोकावणाऱ्या फांद्यांवर मनमोहक जाळीदार नक्षीकाम केलेले घरटे विणण्यात सुगरण पक्षी सध्या मग्न असलेला आपल्याला पहावयास मिळत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात विणीच्या हंगामात सुगरण पक्ष्यातील नर पक्षी मजबूत घरटे बांधतो; पण हे घरटे अर्धवट बांधलेले असते. सुगरण पक्षी पंख फडफडवीत आवाज काढत मादीला साद देऊन घरटे पहावयास बोलवतो. मादीला आकर्षित करण्यासाठी एकाच झाडावर नर पक्षी दोन ते तीन घरटे तयार करतो. मादी अर्धवट घरटे न्याहाळते व त्यातील त्यांना योग्य वाटणारे घरटे निवडून घरट्याचे राहिलेले अपूर्ण वीणकाम ती नरासोबत पूर्ण करते. म्हणून आपणास अनेक ठिकाणी काही पूर्ण झालेली तर काही अर्धवट घरटी दिसतात. अर्धवट राहिलेली घरटी नाकारलेली असल्याचे समजते.

पर्यायाने हे घरटे तयार करणारा नर पक्षीदेखील मादीने नाकारल्याचे मानले जाते. गवताच्या पात्याचा एक-एक तोडा इवल्याशा चोचीने काढून त्याची सुबक अशी जाळीदार रचना करून आकर्षक घरटे बांधले जाते. सुगरण मादी घरट्यात एकावेळी सहा ते सात अंडे घालते. साधारणत: पंधरा ते वीस दिवसात घरट्यातून पिल्ले बाहेर डोकावू लागतात. सुमारे महिनाभर सुगरण पक्ष्यांचा हा परिवार त्या परिसरात राहतो व नंतर उडून जातो. पुन्हा घरट्याकडे ते परत फिरून येत नाही. चिमण्याप्रमाणे सुगरण पक्षीदेखील वर्षभर झाडावरच राहतो. सुगरणीचा खोपा ऊन, वारा, वादळ, पावसातही तग धरून वाºयाच्या झोताबरोबर हेलकावत राहतो. सुगरण हा वसाहत करून समूहाने राहणारा पक्षी असल्याने एकाच झाडावर त्यांची २० ते २५ घरटी दिसतात. पक्ष्यांच्या दुनियेत घरटेबांधणीच्या क्षेत्रात अनेक गृहरचनाकार पक्षी या कलेत माहीर आहेत. त्यात सुगरण, सुतार, गरुड, मधमाशी आदी उदाहरणे देता येतील. यांच्यासारखी घरटी कुणालाच बांधता येणार नाहीत. मात्र सुगरणीचे घरटे म्हणजे कारागिरीचा एक कळसच म्हटला पाहिजे.

Web Title: Almost to build a nest of sugarcane ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.