पाटणे परिसरात खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:58 PM2020-06-12T21:58:19+5:302020-06-13T00:12:09+5:30
पाटणे : परिसरात यावर्षी निसर्ग वादळापासून दररोज थोड्याफार प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे तसेच पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पिकांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
पाटणे : परिसरात यावर्षी निसर्ग वादळापासून दररोज थोड्याफार प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे तसेच पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप पिकांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने हाती आलेली खरिपातील पिके नष्ट झाल्यामुळे शेतकºयाचं अतोनात नुकसान झाले होते. मात्र यावर्षी मान्सूनपूर्व तसेच मान्सूनचा पाऊस समाधानकारक पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, शेतकामांना वेग आला. शेतकरी पेरणी कामात व्यस्त आहेत. पेरणीसाठी लागणारी रासायनिक खते व बियाणे घेण्यासाठी शेतकºयांची खते बी-बियाणं दुकानांवर गर्दी होत आहे. खते आणि बियाणांचे दर वाढल्याने त्याचा फटका बळीराजाला बसत आहे. पेरणीसाठी बैलांचा आणि ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. खासकरून बरेच शेतकरी पेरणीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करतात. पेरणीसाठी एकरी १४०० ते १५०० रूपये प्रतिएकर ट्रॅक्टरची मजुरी लागते. ट्रॅक्टरच्या साहाय्याने दिवसभरात पाच ते सहा एकर क्षेत्रावर पेरणी केली जाते. त्यासाठी रासायनिक खते टाकण्यासाठी चार मजूर व मका बियाणे टाकण्यासाठी सहा मजूर लागतात.