कांदा उत्पादकांकडून घरगुती बियाने तयार करण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 09:59 PM2020-10-14T21:59:09+5:302020-10-15T01:35:27+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिाक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकर्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण रोपे नष्ट झाले. यामुळे प्रत्येक कांदा उत्पादक शेतक-यांनी पुन्हा पुन्हा कांदा बियाणे टाकल्यामुळे व शेतकर्यांजवळील बियाणे संपल्यामुळे बाजारात बियाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. तसेच बियाणे सध्या साडेतीन ते चार हजार रु पये किलोने विकले जात असल्यामुळे यंदा कांदा उत्पादक शेतक-यांनी जास्त डोंगळा लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.
बर्याचदा कांदा बियाण्याची गरज स्वत: डोंगळे लावून शेतकरी भागवतात. बियाणे कमी पडल्यास नातेवाइकांकडून उसनवारीने घेतले जाते. यावर्षी मात्र पावसाने सर्वच कांदा उत्पादक पोळले गेल्याने बियाणे मिळणे मुश्किल झाले आहे. बाजारामध्ये कांदा बियाणे विक्र ीसाठी उपलब्ध असले तरी या बियाण्यापासून कांद्याचे योग्य उत्पादन त्याची खात्री नसल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकर्यांनी बाजारातील देण्याऐवजी स्वत: बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे.
मागील वर्षी झालेल्या गारपीट व बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकास बरोबरच कांदा पिकाचे व कांद्याच्या डोंगळ्यापासून बियाणे तयार होतात ते डोंगळे पूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे डोंगळ्यांचे मोठे नुकसान होऊन बियाणे तयार झाले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा फटका बसून आज बाजारातून चढ्या भावाने कांदा बियाणे खरेदी करावे लागत आहे पुढील हंगामात पुन्हा कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कांदा उत्पादक डोंगळा लागवडीवर भर देत असल्याचे दिसत आहे.
1) परतीच्या पावसाने कांदा रोपे नष्ट झाल्याने शेतकरी वर्गाचा घरगुती कांदा बियाने तयार करण्यावर भर.
2) कांदा बियाने मिळत नसल्याने डोंगळा लागवडीवर भर.
3) खरीप हंगामात सर्व भांडवल खर्च करून ही उत्पन्न न मिळाल्याने घरगुती बियाने तयार करून खर्चाची काटकसर.
मागील वर्षी डोंगळे खराब झाल्यामुळे यंदा कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झाली. मात्र, बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी आम्ही यंत्राच्या साह्याने कांदा बियाणे पेरून कांदा लागवड करणार असून यासाठी मजुरांचीही बचत होणार आहे.
- भाऊसाहेब ढाकणे, कांदा उत्पादक, ओझे