नववर्षाच्या स्वागतासाठी स्टेशनरी दालनांतही लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:08 AM2020-12-28T04:08:51+5:302020-12-28T04:08:51+5:30

नाशिक : दरवर्षी डिसेंबर महिन्यात दुकानांमध्ये डायऱ्या, कॅलेंडर्स दिसायला लागतात. त्यामुळे नववर्षाचे स्वागत अगदी अखेरच्या टप्प्यात आल्यावर डायऱ्या ...

Almost in the stationery gallery for the New Year's reception | नववर्षाच्या स्वागतासाठी स्टेशनरी दालनांतही लगबग

नववर्षाच्या स्वागतासाठी स्टेशनरी दालनांतही लगबग

Next

नाशिक : दरवर्षी डिसेंबर महिन्यात दुकानांमध्ये डायऱ्या, कॅलेंडर्स दिसायला लागतात. त्यामुळे नववर्षाचे स्वागत अगदी अखेरच्या टप्प्यात आल्यावर डायऱ्या आणि कॅलेंडर्स खरेदीसाठीदेखील नागरिकांची गर्दी हाेते. तसेच यंदा नववीपासूनची शाळा पुढील आठवड्यात सुरू होत असल्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांची पावलेदेखील खरेदीसाठी दुकानांकडे वळल्याने वर्षअखेरीस स्टेशनरी दालनेदेखील गजबजली आहेत.

२०२० हे वर्ष सर्वार्थाने नकोसे ठरले. वर्षाच्या सुरुवातीला मार्च महिन्यात कोरोनाचे संकट धडकले. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. पाठोपाठ वादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांनी शेतीची नासधूस केली. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. सगळेच त्रस्त झाले.त्यातून सावरेपर्यंत वर्ष संपायला आले. अशा नकोशा वर्षाला निरोप देताना नववर्षाच्या स्वागताला सर्वजण सज्ज झाले आहेत.नवे वर्ष निरामय आरोग्य घेऊन यावे तसेच नवीन वर्षातील सुखद आठवणीदेखील आपल्या डायरीत असाव्यात यासाठी अनेक नागरिक वर्षअखेरीस नवीन डायरी खरेदीला प्राधान्य देतात. डायरी लेखन ही कला नियमितपणे लिहिणाऱ्यांना अवगत होत असते. त्यात काही जण मात्र दैनंदिन जमाखर्च लिहिणे, ठळक नोंदी करणे एवढाच डायरीचा मर्यादित वापर करतात. तर काही नागरिक या डायऱ्यांचा उपयोग त्या दिवसाच्या केवळ अत्यंत महत्त्वाच्या किंवा पुढील तारखांच्या कमिटमेंटची नोंद ठेवण्यासाठी करतात. कोरोनाच्या संकटाने अनेक व्यवसायांवर गंभीर परिणाम झाले. तसाच तो डायरी व्यवसायावरही झाला. यंदा डायऱ्यांंमध्ये कोणतीही दरवाढ नसली तरी ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून भेट देण्यासाठी डायऱ्यांना नेहमी मोठी मागणी असते. यावर्षी त्यांचाही फारसा उत्साह नाही.

इन्फो

डायऱ्यांचे वेगळेपण

पॉकेट डायऱ्या २५ ते ७५ रुपयांना मिळतात. दररोज वापरण्यासाठी डायऱ्या ८० ते ८०० रुपयांना उपलब्ध आहेत. ऑर्गनायझर्स ५०० रुपयांपासून तर प्लॅनर्स १०० ते २०० रुपयांत मिळतात. १२ डायऱ्यांचा मंथली सेट ८५ ते १५० रुपयांना आहे. याशिवाय एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअर्स, वकील अश्या व्यवसायानुरूप डायऱ्यांना पसंती मिळते. कुलूप लावता येईल अशाही डायऱ्या आता मार्केटमध्ये दिसू लागल्या आहेत.

Web Title: Almost in the stationery gallery for the New Year's reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.