उड्डाणपुलाबरोबरच मेट्रो लाईन प्रकल्प एकत्र उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:14+5:302021-08-29T04:17:14+5:30

या तीनही प्रकल्पांची माहिती केंद्राई...................... इंजिनियर असोशिएशनसह विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उंटवाडी येथील अभियंता कार्यालयात प्रकल्पांचे ...

Along with the flyover, a metro line project will be set up together | उड्डाणपुलाबरोबरच मेट्रो लाईन प्रकल्प एकत्र उभारणार

उड्डाणपुलाबरोबरच मेट्रो लाईन प्रकल्प एकत्र उभारणार

Next

या तीनही प्रकल्पांची माहिती केंद्राई...................... इंजिनियर असोशिएशनसह विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना मिळावी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उंटवाडी येथील अभियंता कार्यालयात प्रकल्पांचे सादरीकरण केले. चेन्नई-सुरत या महामार्गाचा प्रारंभ पेठ तालुक्यातून होत असून नाशिक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यांतील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. प्रस्तावित महामार्ग सहापदरी असणार आहे. या महामार्गामुळे सुरत-नाशिक हे अंतर अवघे दोन तासांवर येणार आहे. सुमारे पाच किलोमीटर महामार्ग नाशिक महानगरपालिका हद्दीतून जाणार असून ७० मीटर रुंदीचा असणार आहे. या महामार्गामुळे पेठ, सुरगाणा तालुके पर्यटनासाठी विकसित होणार आहेत. महामार्गाच्या दोनही बाजूस ७.५ मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे. महामार्गावर वळण खूपच कमी असणार असल्याने विविध शहरांमधील अंतर कमी होणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी टेनेल तर उमराणे, आडगाव, ओढा, वावी या चार ठिकाणी इंटर चेंजर असणार असून जितक्या किलोमीटरचा रस्ता वापराल तितकाच टोल भरण्याची व्यवस्था असणार आहे.

मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्या दरम्यानच द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा समावेश भारतमाला योजनेत झाला असल्यानेच दोनही प्रकल्पांची कामे एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे. या तीनही स्तरांमधील अंतर सतरा फूट उंचीचे असणार आहे. मेट्रो आणि सुरत-चेन्नई महामार्गाचा आराखडा अंतिम टप्यात असून लवकरच आराखडा पूर्ण होणार असल्याची माहिती नॅशनल महामार्गाचे व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी दिली. वरील तीनही प्रकल्पांचे आराखडे पूर्ण झाल्यावर पुन्हा एकत्रित बैठक घेऊन काही सूचना असल्यास त्या सूचनांचा समोवश करण्यात येणार असल्याचे मेट्रो आणि नॅशनल हायवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीस नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी बी.एस. साळुंके, आकार अभिनव एजन्सीचे विनय शर्मा, दिलीप शुक्ला, मेट्रोचे विकास नागुलकर, संकेत केळकर, केंड्राईचे.................................. रवी महाजन, अनंत जातेगावकर, सचिन, बागड, सुशील बागड, अनिल आहेर, अतुल शिंदे, रसिककुमार बोथरा, मनोज खिवंसरा, सागर शहा, आनंत ठाकरे, विजय चव्हाणके आदी उपस्थित होते.

चौकट====

असा असेल उड्डाणपूल

द्वारका-दत्तमंदिर या दरम्यानच्या उड्डाणपुलाची रुंदी ४५ मीटर असणार आहे. या उड्डाणपुलाच्या दरम्यान सात ठिकाणी जंक्शन असणार असून जंक्शनवर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प असणार आहेत. उड्डाणपूल चार लेनचा असणार असून दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोड ५.५ तर रॅम्प ७.५ मीटरचा असणार आहे. सुमारे हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. द्वारका-दत्तमंदिर या दरम्यान तिहेरी वाहतूक व्यवस्था असणार आहे. रस्ता, त्यावर उड्डाणपुल त्यावर त्यावर मेट्रो असे नियोजन असणार आहे. वेळ आणि खर्च कमी व्हावा, यासाठी उड्डाणपूल आणि मेट्रो या दोनही प्रकल्पांचे काम एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे.

Web Title: Along with the flyover, a metro line project will be set up together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.