भेटीगाठीबरोबरच मदतही आटली; वृद्धाश्रमातील आजी-आजोबा एकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:06+5:302021-04-21T04:15:06+5:30
वृद्धाश्रमातील सदस्य संख्या -७० महिला - ३२ पुरुष - ३८ चौकट- भेट देणा-यांची संख्या रोडावली शहरातील वात्सल्य, त्याच बरोबर ...
वृद्धाश्रमातील सदस्य संख्या -७०
महिला - ३२
पुरुष - ३८
चौकट-
भेट देणा-यांची संख्या रोडावली
शहरातील वात्सल्य, त्याच बरोबर सामनगाव येथील वृद्धाश्रमांमध्ये इतर वेळी भेट देणा-यांची संख्या मोठी होती. सध्या मात्र या वृद्धाश्रमांकडे कुणी फिरकत नसल्याचे स्थिती आहे. वात्सल्य वृद्धाश्रमात महिन्याकाठी किमान ४०-५० नागरिक भेट देत असत. सध्या ही संख्या शून्यावर आली आहे. संस्थाचालकांनीही बाहेरील व्यक्तींना थेट प्रवेश देणे बंद केले आहे.
चौकट-
कोरोनामुळे वृद्धाश्रमात होणारे अन्नदान आणि रोख स्वरूपात मिळणारी देणगी यांचे प्रमाण पूर्णपणे घटले आहे. आहे त्या उपलब्ध पैशांवर संस्थाचालकांना सध्या खर्च भागवावा लागत आहे. आजच्या मदतीवर भविष्याचे नियोजन होत असते; मात्र आता मदतच मिळत नसल्याने या संस्थांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोट-
येथे बरं आहे
येथे वेळच्या वेळी चहा, नाष्टा मिळतो. जेवणाची चांगली सोय असल्याने येथे बरं आहे. घरी तरी रोज वरणभात होत नाही. येथे मात्र दोन वेळा दररोज वरणभात खायला मिळतो. भेटायला मात्र कुणीही येत नाही.
कोट-
वाटेकडे डोळे
घरचं कुणीतरी भेटायला येईल असं वाटतंय; पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून कुणीही आलं नाही. रोज वाटेकडे डोळे लावूनही काही फायदा होत नाही. आता आमचं काय होणार, हे देवालाच माहिती.
कोट-
फार दूरवरून वृद्धाश्रमात आलो आहे. जेवणाची व्यवस्था चांगली आहे; मात्र जवळचे कुणीही भेटत नाही, याची खंत आहे. पहिले कुणी ना कुणी येथे येऊन आमच्याशी गप्पा मारत होते. त्यामुळे दिवस कसा जायचा हे समजत नव्हते. आता एक-एक क्षण घालवणे कठीण झाले आहे.