आधीच बिबट्याची दहशत त्यात भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:30 AM2017-10-07T01:30:57+5:302017-10-07T01:31:13+5:30

तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या दहशतीने कादवा नदीकाठच्या भागातील नागरिक धास्तावले असतानाच या भागात रात्रीच्या लोडशेडिंगने नागरिक भयभीत झाले असून, रात्रीच्या वेळी किमान सिंगल फेज वीजपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील मातेरे यांनी दिला आहे.

Already in leakage of leopard | आधीच बिबट्याची दहशत त्यात भारनियमन

आधीच बिबट्याची दहशत त्यात भारनियमन

Next

दिंडोरी : तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या दहशतीने कादवा नदीकाठच्या भागातील नागरिक धास्तावले असतानाच या भागात रात्रीच्या लोडशेडिंगने नागरिक भयभीत झाले असून, रात्रीच्या वेळी किमान सिंगल फेज वीजपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील मातेरे यांनी दिला आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, ओझे, करंजवण, म्हेळुस्के, अवनखेड, पिंपळगाव केतकी, परमोरी, वरखेडा, मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपूळ, चिंचखेड आदी कादवा नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर सुरू असून, वनविभागाने दोन डझन पिंजरे , कॅमेरे लावत मोठा फौजफाटा तैनात केला आहे, पण बिबटे पिंजºयांकडे फिरकत नसून इतर भागात उपद्रव करत आहेत. रात्रीच्या वेळी डरकाळ्या फोडत पाळीव प्राण्यांवर हल्ले करत दहशत करीत आहे. यामुळे सायंकाळी पाचनंतर नागरिक घराबाहेर पडत नसून उसाच्या शेताजवळ राहणारे नागरिक जीव मुठीत धरून रात्र काढत आहेत. त्यातच रात्रीचे भारनियमन सुरू झाल्याने शेतकººयांच्या अडचणी वाढल्या आहेत. रॉकेल मिळत नसल्याने दिवेही लावता येत नसून नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. शेतकºयांनी किमान सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केली आहे. अन्यथा या भागातील नागरिक वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा सुनील मातेरे यांनी दिला आहे. नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात बिबट्याचा संचार वाढला असून, तीन दिवसात बिबट्याने पसिरातील शेळी, कुत्रा व वासराचा फडशा पाडल्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. नायगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, या बिबट्याने मंगळवारी नायगाव-पिंपळगाव निपाणी रस्त्यावरील भांगरे वस्तीवरील त्र्यंबक किसन भांगरे यांच्या घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला करु न वासराचा फडशा पाडला. बुधवारी रात्री जवळच असलेल्या बाळू भांगरे यांच्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. एकाच वस्तीवर सलग दोन दिवस बिबट्याने वासरु व कुत्र्याला आपले भक्ष्य बनवल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावला असून, बिबट्याने गुरु वारी जेजुरकर वस्तीकडे आपला मोर्चा वळवून संजय कचेश्वर जेजूरकर यांच्या घराशेजारी बांधलेल्या शेळीची शिकार करून परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. गेल्या आठवड्यापासून सलग तीन दिवस बिबट्याने शिकार केल्याने व अनेकांना दर्शन दिल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नायगाव परिसरात उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा असल्याने नायगाव, जोगलटेंभी व सावळी परिसरात बिबट्यासह अनेक जंगली प्राणी या परिसरात वास्तव्य करत असल्यामुळे गंगाथडी भागातील शेतकºयांसह शेतमजुरांना काम करणे जिकिरीचे बनले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.

Web Title: Already in leakage of leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.