मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाेन पर्यायी ऑक्सिजन टाक्या

By संजय पाठक | Published: April 24, 2021 01:22 AM2021-04-24T01:22:41+5:302021-04-24T01:23:14+5:30

शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन टाक्या उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

Alternative oxygen tanks in municipal hospitals | मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाेन पर्यायी ऑक्सिजन टाक्या

मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाेन पर्यायी ऑक्सिजन टाक्या

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्णय : दुर्घटना टाळण्यासाठी पर्यायी यंत्रणेची उभारणी

नाशिक :  शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन टाक्या उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शुक्रवारी (दि.२३) वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट उद्‌भवल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात अनेक उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. घेतला आहे. 
२१ केएल ऑक्सिजन टाक्या बांधण्याचा निर्णय
ऑक्सिजन आणि व्हेंटिलरबरोबरच ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे आढळले होते. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ऑक्सिजन पुरवठा करताना तत्काळ टँकर आले नाही तर किमान रुग्णालयांना काही दिवस दिलासा देता येईल, या दृष्टीने झाकीर हुसेन रूग्णालयात १३ तर बिटको रुग्णालयात २१ केएल ऑक्सिजन टाक्या बांधण्याचा निर्णय घेतला. त्यातील झाकीर हुसेन रुग्णालयातील टाकी तर ३१ मार्च राेजीच बसविण्यात आली होती. 
आलटून पालटून दिला जाणार ऑक्सिजन
महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये दोन पर्यायी टाक्या तीन केएलच्या असतील. सध्याच्या टाक्या आणि त्याला  पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या या टाक्या यातून आलटून-पालटून ऑक्सिजन रुग्णांना  दिला जाईल. एखादी दुर्घटना घडलीच तर किमान एकातरी टाकीमधील ऑक्सिजनमधून रुग्णांचे प्राण वाचू शकतील.

Web Title: Alternative oxygen tanks in municipal hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.