समाजात गट-तट असले तरी उद्देश मात्र आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:30+5:302021-05-26T04:15:30+5:30
सातपूर : मराठा समाज हा महाराष्ट्रातील बहुसंख्य असल्याने गट-तट निर्माण होणे साहजिक आहे. सद्यस्थितीत तीन गट निर्माण झाले असले ...
सातपूर : मराठा समाज हा महाराष्ट्रातील बहुसंख्य असल्याने गट-तट निर्माण होणे साहजिक आहे. सद्यस्थितीत तीन गट निर्माण झाले असले तरी, लढाईची दिशा मात्र सर्वांची एकच आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हे गट प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
मंगळवारी नाशिक दौऱ्यावर पाटील आले होते, त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या काळामध्ये समाजाला उभारी देण्याचे काम राज्य सरकारने करावे. राज्य सरकारच्या हातात जे विषय आहेत, ते त्यांनी तात्काळ सोडवावेत आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करून मराठा आरक्षणाप्रति सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पाटील यांनी करण गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, रमेश केरे पाटील, आप्पासाहेब कुडेकर, प्रमोद जाधव, बाळासाहेब लांबे, दिनकर कांडेकर, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, किरण डोके, निवृत्ती शिंदे, सुनील भोर, प्रीतेश पाटील, अविनाश गायकर, किरण बोरसे, संदीप पवार, माधवी पाटील, युवराज सूर्यवंशी, आकाश हिरे आदी उपस्थित होते.