मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:46+5:302021-09-10T04:19:46+5:30

नांदगाव (संजीव धामणे) : मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ...

Although the world is broken, the spine is not broken | मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

Next

नांदगाव (संजीव धामणे) : मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा....या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कवितेची आठवण आल्यावाचून राहत नाही. नांदगावला मंगळवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्ध्वस्त झालेले संसार आणि पूर ओसरल्यानंतर गाळात आपल्या वस्तू शोधणारी कुटुंब. लेंडी नदीच्या किनाऱ्यावर बसून रुपयांची नाणी शोधण्यासाठी परिवाराची केविलवाणी धडपड धडपड दिसून आली.

बुधवारी शहरात हा... हा.... कार उडवून दिलेल्या शाकांबरी व लेंडी या दोन्ही नद्यांचे वस्तीत शिरलेले पुराचे पाणी एकीकडे ओसरत असताना उद्ध्वस्त संसार सावरण्यासाठी गाळात दडलेल्या वस्तू शोधण्यात आख्खे कुटुंब कामाला लागल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. शहरातील व्यवसाय सुरू झाले आहेत. पुराच्या खुणा बघणाऱ्या बघ्यांची संख्या लक्षणीय आहे. अजूनही काठावरचा कचरा, चीजवस्तू नदीच्या प्रवाहात तरंगताना दिसून येत आहेत. पुलाला अडकलेला कचरा व घाण ठिकठिकाणी दिसून येत आहे. विस्थापित झालेल्या अधिकतर लोकांनी मस्तानी अम्मा मशिदीत आश्रय घेतला आहे. त्यांच्यासाठी नगर परिषदेतर्फे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

२००९ च्या पुरानंतर प्रशासन व नागरिक दोघांनी धडा घेतला असता तर कालची परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी प्रतिक्रिया येत असून ते शिमग्यानंतरचे कवित्व असल्याचेच सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमणे उठविण्यासाठी वेळोवेळी तत्कालीन मुख्याधिकारी सुधीर राऊत, अजय भदाणे तसेच तहसीलदार सुनील गाढे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती. पण उपयोग झाला नाही. त्यानंतर २००९ सालात पुराच्या तडाख्यात अतिक्रमणे हटवली. आजपर्यंतच्या अनुभवातून राजकीय नेते, प्रशासन व महत्त्वाचे म्हणजे जनता काही धडा घेणार आहे की नाही? हाच कळीचा प्रश्न आहे.(०९ नांदगाव ँकर)

Web Title: Although the world is broken, the spine is not broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.