माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:14 PM2020-01-22T22:14:47+5:302020-01-23T00:13:32+5:30
नायगाव : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या १९८८ सत्रातील माजी विद्यार्थ्यांनी जोगलटेंभी येथील गोदावरी व दारणेच्या संगमावरील निसर्गरम्य वातावरणात आयोजित स्नेहमेळाव्यात शालेय आठवणींना उजाळा दिला.
नायगाव : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या १९८८ सत्रातील माजी विद्यार्थ्यांनी जोगलटेंभी येथील गोदावरी व दारणेच्या संगमावरील निसर्गरम्य वातावरणात आयोजित स्नेहमेळाव्यात शालेय आठवणींना उजाळा दिला.
येथील सूर्योदय पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन कातकाडे, गोदा युनियनचे व्यवस्थापक राजेंद्र काकड, राजेंद्र बोडके, डी. बी. पवार, महेंद्र सांगळे, विलास लहाने आदी मित्रांनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप गु्रपच्या माध्यमातून मित्र व मैत्रिणींना जमविले.
यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणी आठवणीबरोबर वैचारिक मंथन करत गप्पागोष्टी मारल्या. डी. बी. पवार, राजेंद्र काकड यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी राजेंद्र गिलबिले, सुश्मिता लेले, सुनंदा गिलबिले, संजय कातकाडे, उद्धव मुंडे, कैलास दौड, चिंतामण सानप, मनोज खाडे, सुदाम धात्रक, विलास गिते, रवींद्र गिते, किशोर गिलबिले, नानुमिया शेख, सरला गिलबिले, विजय काकड, बाबा चव्हाणके आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
३३ वर्षापूर्वी ज्या शिक्षकांनी आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाम्रूत दिले अशा एस. एच. आहेर, डी. एन. भास्कर, एस. पी. गारे, जी. एस, खैरणार, एस. बी. येवले आदी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून गुरूजणांप्रती कृ तज्ञता व्यक्त केली. यावेळी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत पुन्हा भेटण्यासाठी आस मनात घेऊन मेळाव्याची सांगता झाली. नायगाव येथील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक आदी.