महाविद्यालयीन आठवणींनी रंगला माजी विद्यार्थी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:36 PM2018-02-25T12:36:59+5:302018-02-25T12:36:59+5:30
श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत 2003 ते 2017 या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विविध कायर्क्रमांनी रंगला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली.
नाशिक : श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत 2003 ते 2017 या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विविध कायर्क्रमांनी रंगला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिष संघवी उपस्थित होते. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य अजय देशपांडे , संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार , महावीर पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे ,डीन डॉ. प्रियांका झंवर , चार्टर्ड अकौंटंट आनंद झंवर आदी उपस्थित होते. ज्ञान म्हणजे काय ?, ते कसे मिळवले जाते ?,मिळविलेल्या ज्ञानाचा जीवनात कसा वापर करावा ? याबद्दल अध्यक्ष हरिष संघवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, असा उपक्रमाचा उद्देश असल्याचे श्री हरिष संघवी यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांनी त्यासाठी योगदान देवून सहकार्य करावे असे प्राचार्य अजय देशपांडे म्हणाले. यावेळी मनोज मंडाले, गणेश खुर्द्ळ , भाग्यश्री जोशी या माजी विद्यार्थिनींनी तसेच माजी विद्यार्थी व सध्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. धनश्री बनकर , प्रा. वृषाली जगताप , यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी चेतन माळी , सायली चौधरी, सध्या कार्यरत प्रा. वृषाली देसाई व प्रा. धनश्री बनकर यांनी त्यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहुतांश विद्यार्थी नोकरी आणि व्यवसायासाठी धुळे ,जळगाव, मुंबई पुणे अगदी परदेशातून म्हणजेच लंडनहूनही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांची भेट शिक्षक व त्यांच्या जुन्या मित्रांबरोबर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला. नवनवीन विषयावर चर्चा घडून यावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन आले होते. सूत्रसंचालन प्रा. अनघा सर्वज्ञ यांनी केले.