माजी विद्यार्थ्यांनी सोडविला अस्वली विद्यालयाचा पाणीप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 05:15 PM2020-01-04T17:15:58+5:302020-01-04T17:16:11+5:30

स्नेहमेळावा : शाळेला जलशुद्धिकरण यंत्र भेट

Alumni solved water question of Aswali school | माजी विद्यार्थ्यांनी सोडविला अस्वली विद्यालयाचा पाणीप्रश्न

माजी विद्यार्थ्यांनी सोडविला अस्वली विद्यालयाचा पाणीप्रश्न

Next
ठळक मुद्देवर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मनमोकळ्या मारल्या गप्पा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयातील सन १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. याचवेळी विद्यालयाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाणीप्रश्नही विद्यार्थ्यांनी सोडविला.
अस्वली येथील जनता विद्यालयाच्या आनंदमेळाव्याचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी एक हजार लिटर क्षमता असलेल्या दोन टाक्या व एक छोटे जलशुद्धिकरण यंत्र असे साहित्य भेट स्वरु पात दिले. इतर माजी विद्यार्थ्यांनी देखील या उपक्र माचा आदर्श घ्यावा असे माजी विद्यार्थी नामदेव धोंगडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मनमोकळ्या गप्पा मारल्या. माजी विद्यार्थिनी मनिषा गायकवाड व अनिता कासार यांनी आपल्या हाताने बनवून आणलेले पदार्थ मुख्याध्यापिक श्रीमती जगताप यांना दिले एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटत पुन्हा एकदा एकमेकांना भेटण्याचे आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी कायमस्वरूपी व सर्वांच्या उपयोगी येईल अशी वस्तू शाळेला भेट दिल्यामुळे आनंद व्यक्त केला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.आर. जगताप यांनी माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी विलास मुसळे, नामदेव धोंगडे, डॉ नरेंद्रसिंग, भाऊसाहेब तांबे, सुदाम धोंगडे, नंदु धोंगडे, रामभाऊ गव्हाणे, बाळू भोर, उत्तम भोर, रामनाथ गुळवे, भाऊसाहेब गुळवे, प्रकाश गुळवे, तानाजी गुळवे, शाताराम गुळवे, संतोष पवार, भाऊसाहेब मुसळे, कमलाकर दवते, उत्तम शिदे, पांडुरंग देवकर, गोकुळ गुळवे, अशोक कांडेकर, मनिषा गायकवाड, अनिता कासार, पंडित भोर आदी उपस्थित होते.

Web Title: Alumni solved water question of Aswali school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.