माजी विद्यार्थ्यांनी जपले शाळेप्रति ऋण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:59+5:302021-09-18T04:14:59+5:30
सटाणा : ज्या शाळेत आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो त्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील मविप्र ...
सटाणा : ज्या शाळेत आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो त्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील मविप्र संस्था संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये २१ वर्षांपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या १ लाख रुपयांच्या रकमेतील ठेवीच्या व्याजातून शाळेतील होतकरू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कोरोनाकाळात मातृ व पितृछत्र हरपलेल्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून सर्व अत्यावश्यक शालेय साहित्य भेट देण्यात आले.
पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी (दि. १४) संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक एस. एन. सोनवणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी रोशन खैरनार, रोहित शिंदे, अतुल कापडणीस, जयेश सोनवणे, सचिन पवार, कमलाकर कुवर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अहिरे, सोनवणे, कापडणीस यांनी मनाेगत व्यक्त केले.
कार्यक्रमास अरुणा बिरारी, एस. आर. भामरे, नंदकिशोर जाधव, ए. एस. देसले, व्ही. के. देवरे, एस. आर. पाटील, एस. एस. पवार, एस. आर. आहेर, वाय. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.
शेखर दळवी यांनी सूत्रसंचालन केले. रोहित शिंदे यांनी आभार मानले.
इन्फो...
शाळेचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही माजी विद्यार्थ्यांनी केला. सध्या शिक्षण घेत असलेल्या पिढीवरही यानिमित्ताने संस्कार होण्यास मदत होईल.
- रोशन खैरनार, माजी विद्यार्थी
शालेय जीवनात संस्कारांचे मिळालेले धडे करिअरमध्ये यशस्वी होण्यास उपयुक्त ठरले. शाळेचे ॠण फेडण्यासाठी यापुढील काळात आम्ही इतर सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करत पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न राहील.
- अतुल कापडणीस, माजी विद्यार्थी
लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देताना राघो अहिरे, एस.एन.सोनवणे, रोशन खैरनार, रोहित शिंदे, अतुल कापडणीस आदी. (१६ सटाणा)
160921\532316nsk_26_16092021_13.jpg
लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देताना राघो अहिरे, एस.एन.सोनवणे, रोशन खैरनार, रोहित शिंदे, अतुल कापडणीस आदी.